ISRO दमदार कामगिरी, वजनदार उपग्रह अवकाशात स्थिरावला, बाहुबली रॉकेटचा केला वापर!

Published : Nov 02, 2025, 08:00 PM ISTUpdated : Nov 02, 2025, 08:01 PM IST
ISRO Successfully Launches CMS 03 Satellite

सार

ISRO Successfully Launches CMS 03 Satellite : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) LVM-3 रॉकेटद्वारे CMS-03 हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह नौदल आणि लष्कराच्या दळणवळण सुविधांमध्ये सुधारणा करेल.

ISRO Successfully Launches CMS 03 Satellite : श्रीहरिकोटा येथून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारतीय नौदल आणि लष्कराच्या दळणवळण सुविधा अधिक सुधारण्यासाठी डिझाइन केलेला CMS-03 हा अत्याधुनिक दूरसंचार उपग्रह आज (रविवार) यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण तळावरून, आज सायंकाळी ५.२६ वाजता CMS-03 उपग्रह घेऊन LVM-3 (GSLV मार्क-3) रॉकेटने अवकाशात झेप घेतली. विविध टप्प्यांत विभागलेल्या रॉकेटने उपग्रहाला यशस्वीरित्या नियोजित भू-स्थिर कक्षेत स्थापित केले.

भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी CMS-03 हा सर्वात जास्त वजनाचा उपग्रह आहे. या वजनदार उपग्रहाला वाहून नेत असल्यामुळे LVM-3 रॉकेटला 'बाहुबली' असेही म्हटले जाते.

 

 

१,६०० कोटी रुपयांमध्ये तयार झाला ‘CMS-03’

सध्या वापरात असलेल्या जीसॅट-७ (रुक्मिणी) उपग्रहाचे आयुष्य लवकरच संपणार असल्याने, त्याच्या जागी हा उपग्रह सुमारे १,६०० कोटी रुपये खर्च करून इस्रोने तयार केला आहे.

४,४१० किलो वजनाचा हा CMS-03 दूरसंचार उपग्रह किमान १७० किमी ते कमाल २९,९७० किमी अंतराच्या भू-स्थिर कक्षेत स्थापित करण्यात आला.

भू-स्थिर कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेल्या दूरसंचार उपग्रहांपैकी हा आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह आहे, हे विशेष.

 

 

नौदलाला बळकटी देणारी अत्याधुनिक वैशिष्ट्ये

या उपग्रहात विस्तारित मल्टी-बँड तंत्रज्ञानासह (Expanded Multi-band Technology) अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आहेत. यामुळे भारतीय लष्कर आणि नौदलाची महत्त्वाची कामे अधिक मजबूत होतील. भारताच्या सागरी सीमांवर बारकाईने नजर ठेवण्यासाठी हा उपग्रह मदत करेल. युद्धनौका आणि विमानांमध्ये सुरक्षित आणि अखंड दूरसंचार सेवा सुधारण्यासाठी हा उपग्रह मदत करेल.

इस्रोने आतापर्यंत देशाच्या दळणवळण सुविधेसाठी ४८ उपग्रह अवकाशात स्थापित केले आहेत. नवीन CMS-03 उपग्रहाचे यश देशाच्या संरक्षण आणि दूरसंचार क्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा