Gold-Silver Prices : इराण-यूएस-इस्रायल युद्धाचा परिणाम सोने-चांदीच्या भावांवर; दरात मोठी चढ-उतार

Published : Mar 06, 2026, 08:12 AM IST
gold silver rate today

सार

Gold-Silver Prices : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा आणि बाजारावर परिणाम झाला आहे. गेल्या चार दिवसांमध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार दिसली. 

Gold-Silver Prices : इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे पश्चिम आखाती देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. हा संघर्ष जागतिक स्तरावर आर्थिक बाजारांवरही परिणाम करत आहे. पश्चिम आखाती देशांमधून जगभरातील अनेक देशांना खनिज तेलाचा पुरवठा होतो, त्यामुळे सध्याच्या संघर्षामुळे तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याचा परिणाम महागाई, जागतिक बाजार आणि किमतींवर होऊ शकतो.

सोनं-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार

गेल्या चार दिवसांमध्ये युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ झाली होती. सोन्याचा भाव प्रतितोळा 1,70,000 रुपयांपर्यंत पोहोचला, तर चांदीचा प्रतिकिलो भाव 2,95,000 रुपयांवर गेले. मात्र, गेल्या काही तासांत दोन्ही धातूंच्या किमतीत मोठी घसरण दिसून आली आहे. सध्या सोने 1,62,000 आणि चांदी 2,60,000 रुपयांच्या आसपास स्थिरावले आहे. हे आश्चर्यकारक आहे कारण सामान्य परिस्थितीत शेअर बाजार कोसळत असताना सोनं-चांदीच्या किमती वाढतात, परंतु सध्याच्या युद्धाच्या परिस्थितीतही दर घसरले आहेत.

युद्ध आणि गुंतवणूकदारांची चिंता

पुण्यातील KRA ज्वेलर्सचे भागीदार अतुल अष्टेकर यांनी सांगितले की, युद्ध किती दिवस टिकते यावर सोन्याचे दर अवलंबून आहेत. जर युद्ध आठ-दहा दिवसांत संपले, तर दर सध्याच्या पातळीवर 1,60,000 रुपयांपर्यंत राहतील. मात्र, युद्ध लांबल्यास तेलाचा पुरवठा कमी होईल, महागाई वाढेल आणि त्यानंतर सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे गुंतवणूकदार आणि बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.

तज्ज्ञांचा अंदाज

अतुल अष्टेकर यांच्या मते, युद्ध तीन-चार आठवडे लांबल्यास तेलाचा पुरवठा प्रभावित होईल आणि भविष्यात महागाईवर परिणाम होईल. महागाई वाढल्यास सोन्याचे भाव वाढतात, त्यामुळे लांबलेल्या युद्धामुळे सोन्याचे दर 2 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. युद्ध लवकर संपल्यास दर फक्त काही टक्क्यांनी बदलतील.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department