वाराणसी (काशी) हे एक प्राचीन शहर आहे. इथल्या अरुंद रस्त्यांमुळे आणि ट्रॅफिकमुळे प्रवाशांना खूप त्रास होतो. विशेषतः पर्यटक आणि भाविकांना मुख्य मंदिरे आणि घाटांवर जाण्यासाठी खूप वेळ लागतो. यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पब्लिक ट्रान्सपोर्ट रोपवे प्रकल्प हाती घेतला आहे. हा देशातील पहिलाच असा रोपवे असेल जो सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरला जाईल. या वर्षाच्या अखेरीस ही सेवा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
25
४५ मिनिटांचा प्रवास फक्त १५ मिनिटांत
हा रोपवे सुरू झाल्यावर प्रवाशांचा खूप वेळ वाचेल. सध्या वाराणसी कँटोन्मेंट रेल्वे स्टेशनवरून गोदौलिया चौकापर्यंत रस्त्याने जायला ट्रॅफिकनुसार सुमारे ४५ मिनिटे लागतात. पण रोपवेने हेच अंतर फक्त १५ ते १६ मिनिटांत पार करता येईल. हा संपूर्ण मार्ग ४.२ किलोमीटरचा आहे. रस्त्यावरील ट्रॅफिकचा कोणताही त्रास न होता थेट इच्छित स्थळी पोहोचता येईल. याचा फायदा स्थानिक लोकांसोबतच काशी विश्वनाथ मंदिरात येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांनाही होईल.
35
५ स्टेशन्स आणि २२० केबल कार्स
या प्रकल्पात सुमारे २२० केबल कार्स असणार आहेत. एका केबल कारमध्ये जास्तीत जास्त १० लोक प्रवास करू शकतील. या कार्स जमिनीपासून सुमारे ४५ मीटर उंचीवरून धावतील.
या रोपवे मार्गावर वाराणसी कँटोन्मेंट, काशी विद्यापीठ, रथयात्रा, गिरजाघर आणि गोदौलिया चौक अशी ५ स्टेशन्स आहेत. स्टेशन्सवर लिफ्टसह सर्व आधुनिक सोयी-सुविधा असतील, ज्यामुळे वृद्ध आणि इतर प्रवाशांनाही सोयीचे होईल.
45
६७५ कोटी रुपयांचा मेगा प्रोजेक्ट
वाराणसी रोपवेच्या उभारणीसाठी सुमारे ६७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ४.२ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणेल. या प्रकल्पाच्या खर्चात केंद्र सरकार ५० टक्के आणि उत्तर प्रदेश सरकार २० टक्के निधी देणार आहे. उर्वरित निधी प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनातून उभा केला जाईल.
55
भाविक आणि पर्यटकांसाठी मोठी सोय
वाराणसीमध्ये दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात. काशी विश्वनाथ मंदिर आणि दशाश्वमेध घाट यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांना भेट देण्यासाठी देशभरातून लोक येतात. रोपवे सुरू झाल्यावर त्यांचा प्रवासाचा वेळ वाचेल आणि ट्रॅफिकच्या त्रासातून सुटका होईल. रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होण्यासही यामुळे मदत होईल. प्रवाशांसोबतच मालाच्या वाहतुकीसाठीही या यंत्रणेचा वापर करण्याचा विचार सुरू आहे. भविष्यात ट्रॅफिकची समस्या असलेल्या इतर शहरांसाठीही हा प्रकल्प एक उत्तम उदाहरण ठरेल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.