CJP Protest: CJP च्या आंदोलनाचा धसका; रेल्वेने रद्द केल्या २४५ गाड्या

vivek panmand   | CMS
Published : Oct 10, 2026, 07:32 PM IST
photo

सार

बिहारची मगध एक्सप्रेस, संपूर्ण क्रांती एक्सप्रेस, यूपीची कानपूर-नवी दिल्ली शताब्दी, प्रयागराज एक्सप्रेस यांसारख्या देशातील अनेक महत्त्वाच्या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली: CJP ने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने तब्बल २४५ गाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये ७५ मेल एक्सप्रेस आणि १७० पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे. विशेषतः दिल्लीला जाणाऱ्या आणि तिथून सुटणाऱ्या गाड्यांना याचा मोठा फटका बसला आहे. राजधानी एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस आणि हमसफर एक्सप्रेस यांसारख्या प्रीमियम गाड्यांवरही या निर्णयाचा मोठा परिणाम झाला आहे.

बिहारमधून सुटणारी मगध एक्सप्रेस, संपूर्ण क्रांती एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस, तसेच उत्तर प्रदेशातील कानपूर-नवी दिल्ली शताब्दी, प्रयागराज एक्सप्रेस आणि श्रमशक्ती एक्सप्रेस यांसारख्या देशाच्या विविध भागांतून धावणाऱ्या प्रमुख गाड्या पूर्णपणे थांबवण्यात आल्या आहेत. पण, तिरुवनंतपुरमवरून सुटणाऱ्या केरळ एक्सप्रेससह काही गाड्यांना यातून वगळण्यात आलं आहे. याशिवाय, मुंबईहून सुटणाऱ्या प्रमुख तेजस राजधानीसह काही गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचा प्रवास मध्येच थांबवण्यात आला आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Durga Puja 2026: दिवसा कोर्टात वकिली, रात्री कलेची साधना! वकिलाने साकारली मेणाची दुर्गा
Abhijeet Dipke: सीजेपीचे संस्थापक अभिजीत डिपके यांना दिल्ली पोलिसांचा मदतीचा हात, आजीच्या निधनानंतर दिली ऑफर