आता आयआरसीटीसीने गुजरात टूर पॅकेज आणले आहे. त्यामुळे केवळ २१ हजार रुपयांमध्ये तुम्हाला गुजरातची सफर करणे शक्य होणार आहे.
अहमदाबाद - आयआरसीटीसी नेहमीच वेगवेगळे टूर पॅकेज घेऊन येत असते. त्यामुळे कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त ठिकाणे फिरतात येतात. आता आयआरसीटीसीने गुजरात टूर पॅकेज आणले आहे. त्यामुळे केवळ २१ हजार रुपयांमध्ये तुम्हाला गुजरातची सफर करणे शक्य होणार आहे.
गुजरातमध्ये खूप सुंदर फिरण्याची आणि खाण्यापिण्याच्या पारंपरिक गोष्टी मिळतात. जर तुम्ही फिरण्याचे शौकीन असाल आणि तुमच्याकडे जास्त बजेट नसेल तर आम्ही तुम्हाला एक सीक्रेट प्लान सांगणार आहोत. या प्लान अंतर्गत तुम्ही गुजरातच्या ५ डेस्टिनेशवर फिरू शकता, ज्यामध्ये येणे-जाणे, राहणे, खाणे-पिणे सर्वकाही प्लानमध्ये असेल. जर तुम्ही एक शानदार, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक प्रवासाच्या शोधात असाल, तर IRCTC "प्राइड ऑफ गुजरात" टूर एक उत्तम पर्याय आहे. या टूरमध्ये गुजरातच्या प्रमुख शहरांना, मंदिरांना, हेरिटेज साईट्स आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला कव्हर केले आहे, तसेच प्रवास आरामदायी ट्रेन आणि हॉटेल्समध्ये राहण्याची सुविधा देखील आहे.
पॅकेजचे नाव:
प्राइड ऑफ गुजरात रेल टूर पॅकेज (Pride of Gujarat Rail Tour Package)
प्रवास आणि पॅकेज बद्दल
ट्रेन नवी दिल्ली (NDLS) वरून रात्री ७:५५ वाजता (१९:५५ HRS) गुजरातसाठी रवाना होईल. यामध्ये 2AC आणि 3AC क्लासमध्ये दर बुधवार आणि शनिवार ट्रेन रवाना होते, ज्यामध्ये पुढचा प्रवास ०७ जून २०२५ साठी ठरवण्यात आला आहे. या पॅकेजमध्ये तुम्हाला अहमदाबाद – पाटन – वडनगर – वडोदरा – स्टॅच्यू ऑफ युनिटी फिरण्यास मिळेल. या पॅकेजमध्ये तुम्हाला ५ रात्री / ६ दिवस फिरण्याची संधी मिळेल.