बंगळुरुत 3BHK फ्लॅटचे भाडे तब्बल 2.7 लाख प्रति महिना, 15 लाख रुपये डिपॉझिट

Published : Jun 02, 2025, 06:12 PM IST
बंगळुरुत 3BHK फ्लॅटचे भाडे तब्बल 2.7 लाख प्रति महिना, 15 लाख रुपये डिपॉझिट

सार

एका थ्री बीएचके फ्लॅटचे भाडे २.७ लाख असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे या शहरातील वाढच्या भाड्याचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.

बंगळुरु - या शहराची भारताचे सिलिकॉन सिटी अशी ओळख आहे. बंगळुरु शहर महाग असल्याचे सातत्याने बोलले जाते. त्यात आता भर पडली आहे. एका थ्री बीएचके फ्लॅटचे भाडे २.७ लाख असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे या शहरातील वाढच्या भाड्याचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. 

सिलिकॉन सिटी बंगळुरूमध्ये घरभाड्याच्या दरांबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. बंगळुरूमधील घरे आणि फ्लॅटच्या भाड्याबद्दल काही लोक संताप व्यक्त करतात, तर काही जण असहाय्यता व्यक्त करतात. आता एका 3 BHK फ्लॅटचे भाडे तब्बल ₹2.7 लाख असल्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आहे.

भारतातील मोठ्या शहरांमध्ये घरभाडे वाढतच आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू सगळीकडे हीच परिस्थिती आहे. कोविडनंतर नोकरीच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढल्याने घरभाडेही गगनाला भिडले आहे. काही दशकांपूर्वी सामान्य शहरांसारखे भाडे असलेल्या बंगळुरूमध्ये आता भाडे ऐकूनच धक्का बसतो. तरीही, इतके महागडे भाडे देऊन राहणारे लोक आहेत. याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट येणे नेहमीचेच आहे. आता एका Reddit युजरने टाकलेली पोस्ट व्हायरल झाली आहे.

बंगळुरूच्या HSR लेआउटजवळील हरळूरमधील एका फ्लॅटच्या भाड्याबद्दल Reddit वर पोस्ट टाकण्यात आली आहे. 'हरळूरमध्ये 3BHK फ्लॅटचे भाडे ₹2.7 लाख!' असे शीर्षक आहे. नो ब्रोकर अ‍ॅपवर असलेले हे भाडे Reddit वर शेअर केले आहे. 1,464 चौरस फूट असलेल्या 3 बेडरूम आणि किचन असलेल्या या फ्लॅटचे भाडे ₹2.7 लाख असल्याचे स्क्रीनशॉटमध्ये दिसत आहे. या फ्लॅटसाठी ₹15 लाख डिपॉझिट द्यावे लागणार आहे.

 

ही पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाने खरोखरच लोक इतके भाडे आणि डिपॉझिट देतात का, असा प्रश्न विचारला आहे. हा फ्लॅट दिसायला चांगला आहे, पण इतके पैसे देण्यासारखा नाही, असे त्याने म्हटले आहे.

युवकाची Reddit वरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, बंगळुरूमध्ये वाढणाऱ्या भाड्यांबद्दल अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने 'कोणीही इतके पैसे देणार नाही, याच भागात ₹50,000 ला फ्लॅट मिळतो' असे म्हटले आहे. दुसऱ्याने 'इथे एक शून्य जास्त आहे' असे म्हटले आहे. म्हणजे ₹27,000 ला भाडे मिळू शकते असे त्यांचे मत आहे. आणखी एकाने 'भाडे वाढवण्यासाठी एजंटचा हा डाव असू शकतो' असे म्हटले आहे. तर काहींनी 'इतके पैसे देऊन फ्लॅट घेणारेही लोक आहेत' त्यांच्यासाठीच हे भाडे ठेवले आहे असे म्हटले आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द