India Post Update: 1 ऑक्टोबर 2025 पासून भारतीय टपाल विभागात मोठे बदल लागू होणार आहेत, ज्यात स्पीड पोस्टच्या दरात वाढ आणि वितरणासाठी OTP सक्तीचा समावेश आहे. या बदलांमुळे टपाल सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि आधुनिक होणार आहेत.
नवीन टपाल धोरणांचा तुमच्या खिशावर आणि सुविधांवर मोठा परिणाम होणार!
मुंबई: 1 ऑक्टोबर 2025 पासून भारतीय टपाल विभागात दोन महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. या बदलांमुळे स्पीड पोस्ट सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होणार असून, याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर आणि अनुभवावर होणार आहे.
28
स्पीड पोस्टसाठी नवे दर लागू
भारतीय टपाल खात्याने नवीन दरपत्रक जाहीर केले असून, स्पीड पोस्टच्या शुल्कात वाढ झाली आहे. यामुळे विविध वजन आणि अंतरानुसार स्पीड पोस्टसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
नवीन नियमानुसार, स्पीड पोस्ट वितरणादरम्यान आता ग्राहकाला ओटीपी (OTP) पाठवण्यात येईल आणि तो टाकल्याशिवाय टपाल वितरित केली जाणार नाही. हा बदल स्पीड पोस्ट सेवा अधिक विश्वासार्ह आणि सुरक्षित बनवण्यासाठी करण्यात आला आहे.
58
आधुनिक सोयीसुविधा देखील उपलब्ध
नवीन बदलांमध्ये खालील आधुनिक सुविधा समाविष्ट आहेत.
ऑनलाइन पेमेंट
SMS वर वितरण नोटिफिकेशन
रिअल-टाइम ट्रॅकिंग
घरबसल्या बुकिंगची सुविधा
68
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची घोषणा
केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून या नव्या धोरणांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “OTP-आधारित वितरण, पर्यायी नोंदणी आणि जीएसटीसह पारदर्शक दर यामुळे भारतातील टपाल सेवा अधिक विश्वासार्ह आणि आधुनिक होणार आहे.”
78
नवीन नियमांचा परिणाम
या नियमांमुळे
ग्राहकांचा सुरक्षिततेवरील विश्वास वाढणार
वितरण प्रक्रिया होणार अधिक जलद आणि पारदर्शक
भारताची 167 वर्षांची टपाल परंपरा टेक्नोलॉजीनुसार पुढे सरकणार
88
पोस्ट सेवा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि ग्राहकाभिमुख होणार
1 ऑक्टोबरपासून सुरू होणारे हे नवे बदल भारतीय टपाल सेवेला एक नवा चेहरा देतील. जरी दर वाढले असले तरी सुरक्षा, विश्वास आणि आधुनिकतेचा अनुभव यामुळे नक्कीच सुधारेल.