Operation Sindoor 3rd Day राजस्थानमध्ये स्फोट, पंजाबमध्ये ड्रोनचा वावर; पाकिस्तान सीमाभागात तणाव

Published : May 09, 2025, 10:00 PM ISTUpdated : May 09, 2025, 10:35 PM IST
Explosions Heard In Rajasthan

सार

जम्मूमध्ये तोफखाना आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आले आणि सायरन वाजले. राजस्थान आणि पंजाबमध्येही स्फोट आणि ड्रोन दिसले. भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे.

आज संध्याकाळी जम्मूमध्ये तोफखाना आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्यानंतर blackout (दिवे गुल करणे) करण्यात आले आणि सायरन वाजले. राजस्थानमधील बारमेर, पोखरण आणि जैसलमेरमध्येही स्फोट ऐकू आले. पंजाबच्या अनेक भागांमध्ये ड्रोन दिसले आहेत.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी गुरुवार आणि शुक्रवारच्या दरम्यानच्या रात्री संपूर्ण पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर दारुगोळ्याचा वापर करून अनेक हल्ले केले, जे "प्रभावीपणे परतवून" लावण्यात आले.

याव्यतिरिक्त, पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LoC) "अनेक शस्त्रसंधीचे उल्लंघन" केले आणि त्याला "यथोचित प्रत्युत्तर" देण्यात आले, असेही लष्कराने म्हटले आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील वाढत्या शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड झाली आहे. भारताने या हल्ल्यात पाकिस्तानच्या भूमिकेकडे बोट दाखवले आहे, तर शेजारील देशाने हा आरोप फेटाळला आहे.

शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उच्च लष्करी नेतृत्वाबरोबर राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीचा सखोल आढावा घेतला आणि उच्च अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दिल्लीत उच्च अलर्ट जारी करण्यात आला असून, शहरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पंजाबमधील अनेक जिल्हा प्रशासनांनी रात्रीच्या वेळी blackout लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. देशातील सुमारे २७ विमानतळे बंद करण्यात आली आहेत.

बुधवारी भारताने 'ऑपरेशन सिंदूर' या नावाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ दहशतवादी तळांवर २५ मिनिटांत २४ क्षेपणास्त्रे डागली होती. हा हल्ला पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आला, ज्यात २६ लोकांचा मृत्यू झाला होता. बुधवार आणि गुरुवारच्या दरम्यानच्या रात्री भारताने उत्तर आणि पश्चिम भारतातील १५ शहरांमधील अनेक लष्करी लक्ष्यांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला.

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती