अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना ग्वांतानामो तुरुंगात पाठवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे.
दिल्ली: अमेरिकेतील बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना ग्वांतानामो तुरुंगात पाठवण्याच्या अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारतात चिंता व्यक्त केली जात आहे. भारतीय नागरिकांना ग्वांतानामो तुरुंगात पाठवण्यास भारत सरकार सहमत नाही, असे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. स्थलांतरितांच्या सुरक्षेसाठी त्यांना भारतात परत आणण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. लष्करी विमानाने का होईना, त्यांना भारतात परत आणावे, असे सरकार सांगणार आहे. सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात ट्रम्प यांनी ३७००० लोकांना देशातून बाहेर काढले आहे.
दरम्यान, भारतीय नागरिकांना मतदानात सहभागी करून घेण्यासाठी आर्थिक मदत दिल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्याबाबत भारत सरकारने अद्याप अधिकृतपणे माहिती मागितलेली नाही. यूपीए सरकारच्या काळातील मदतीबाबतचा हा आरोप असल्याने केंद्र सरकारवर दबाव नाही. ट्रम्प यांच्या आरोपाची केंद्र सरकारच्या अनेक मंत्रालयांकडून चौकशी सुरू असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. मात्र, कुणाला निधी दिला, केव्हा दिला याबाबत अद्याप अमेरिकेकडे कोणतीही माहिती मागितलेली नाही.