Cyclone Shakti : बंगालच्या खाडीत शक्ती चक्रीवादळ निर्माण झाल्याचा अंदाज, IMD कडून या राज्यांसाठी अ‍ॅलर्ट जारी

Published : May 14, 2025, 01:29 PM ISTUpdated : May 14, 2025, 01:30 PM IST
Cyclone

सार

आयएमडीकडून बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा नवे चक्रीवादळ निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले आहे.

Cyclone Shakti Updates : आयएमडीकडून बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा नवे चक्रीवादळ निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले आहे. दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट, दक्षिण बंगाल खाडी आणि उत्तर अंदमान सागरामध्ये शक्ती चक्रीवादळाने धडक दिली आहे.

आयएमडीनुसार बंगालच्या खाडीमध्ये एक नवे चक्रीवादळ निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे देण्यात आले आहे. हे चक्रीवादळ अंदमान समुद्र, निकोबार बेट, दक्षिण बंगालची खाडी आणि उत्तर अंदामान समुद्राच्या काही भागांमध्ये पोहोचले आहे. आयएमडीनुसार, 23 ते 28 मे दरम्यान शक्ती चक्रीवादळ आपला वेग वाढवू शकते. यामुळे अंदमान समुद्र, निकोबार बेट, दक्षिण बंगालची खाडी आणि उत्तर अंदमान समुद्रातील काही भागांना तडाखा बसू शकतो.

आयएमडीने शक्ती चक्रीवादळाबद्दल अधिक माहिती देत म्हटले की, 23 ते 28 मे पर्यंत चक्रीवादळ अधिक भयंकर रुप घेऊ शकते. राज्यातील किनारपट्टीवरील परिसर आणि बांग्लादेशातल खुलना येथे याचा मोठा फटका बसू शकतो. यामुळे आयएमडीने आधीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शक्ती चक्रीवादळ 24 ते 26 मे दरम्यान, लँडफॉल करू शकते.

या देशांना फटका बसण्याची शक्यता

शक्ती चक्रीवादळाचा फटका ओडिसा, बंगाल आणि बांग्लादेशाला होऊ शकतो. याशिवाय बंगालच्या किनारपट्टी भागातून बांग्लादेशमधील खुलाना येथे फार नुकसान करण्याची शक्यता आहे. याच शक्ती चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस, वेगाने वारे वाहणे आणि वादळ अशी स्थिती निर्माण झाल्यास स्थानिक सरकारने अ‍ॅलर्ट मोडवर राहण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.

PREV

Recommended Stories

IndGo प्रवाशांसाठी 'गुड न्यूज', तक्रार करताच ॲक्शन; मंत्रालयाची 'कंट्रोल रूम' ॲक्टिव्ह!
हिवाळ्यात भारतातल्या या ठिकाणी द्या भेट, इथली सफारी देईल दुबईचा फील