Hanuman Chalisa : 'हनुमान चालिसाने मला बळ दिलं', कॅप्टन स्मितने मोदींना सांगितला थरार

Published : Oct 02, 2026, 02:56 PM IST
Hanuman Chalisa : 'हनुमान चालिसाने मला बळ दिलं', कॅप्टन स्मितने मोदींना सांगितला थरार

सार

अचानक हल्ला झाला, वेदना आणि भीती होती, पण मी हिंमत हरलो नाही. १७४ प्रवाशांचा जीव माझ्या हातात होता. अशा वेळी हनुमान चालिसाने मला लढण्याचं बळ दिलं, असा थरार कॅप्टन स्मितने पंतप्रधान मोदींना सांगितला.

नवी दिल्ली : फ्लाय दुबई विमानाच्या हायजॅकच्या घटनेने संपूर्ण जग हादरलं आहे. इस्रायलला जाणाऱ्या या विमानाला को-पायलटने हायजॅक करून पाडण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय पायलट कॅप्टन स्मित मच्छार यांनी हा कट उधळून लावत १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले. सध्या यूएईच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅप्टन स्मित यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉलवर संवाद साधला. हल्ला झाला तेव्हा मी धैर्याने परिस्थितीचा सामना केला. माझ्या हातात १७४ लोकांचा जीव होता. हनुमान चालिसाच्या पठणामुळे मला बळ मिळालं, असं कॅप्टन स्मित यांनी मोदींना सांगितलं.

१७४ लोकांचा जीव माझ्या हातात होता

यूएईच्या रुग्णालयात स्मित मच्छार यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानंतर मोदींनी त्यांना व्हिडीओ कॉल केला. यावेळी स्मित यांनी घडलेला प्रसंग सांगितला. को-पायलटने अचानक हल्ला केला. भीती आणि तणावाच्या वातावरणात मला संघर्ष करायचा होता. जर मी त्यावेळी हिंमत दाखवली नसती, तर १७४ लोकांचा जीव क्षणार्धात गेला असता. त्यामुळे मी धैर्याने लढा दिला, असं स्मित मच्छार म्हणाले.

हनुमानाने मला ताकद दिली

जेव्हा जेव्हा मी संकटात किंवा वेदनेत असतो, तेव्हा मी हनुमान चालिसा वाचतो. यातून मला ऊर्जा मिळते. विमानात हल्ला सुरू असताना मी स्वतःला सावरलं आणि प्रतिकार केला. त्या कठीण प्रसंगात मी हनुमान चालिसाचं पठण करत होतो. हनुमानानेच मला लढण्याची ताकद दिली, असं कॅप्टन स्मित यांनी मोदींना सांगितलं.

कॅप्टन स्मित यांना लहानपणापासूनच घरात भगवद्गीतेचे संस्कार आणि मूल्यं शिकवली गेली आहेत. स्मित यांच्या आई गीता बेन यांनी मोदींशी बोलताना ही माहिती दिली. माझ्या मुलाने भगवद्गीतेची मूल्यं स्वतःच्या आचरणात आणली आहेत, असं गीता बेन म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींनी कॅप्टन स्मित यांना 'हिरो' म्हटलं आहे. तुमचं धैर्य आणि शौर्य संपूर्ण देश अभिमानाने पाहत आहे. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो, अशा शब्दांत मोदींनी त्यांचं कौतुक केलं. मोदींशी बोलताना कॅप्टन स्मित भावूक झाले. पंतप्रधान मोदींशी बोलण्याची संधी मिळाली, याचा मला खूप आनंद आहे. तुमच्याशी बोलणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, अशी भावना कॅप्टन स्मित यांनी व्यक्त केली.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJP आंदोलन
White Tiger : ५५६ किमीचा प्रवास करून 'तेजस' देहराडूनमध्ये दाखल, उत्तराखंडला मिळाला पहिला पांढरा वाघ