Hair Transplant करणे बेतले जिवावर, कानपूरमध्ये दोन इंजिनिअर्सचा हकनाक बळी

Published : May 16, 2025, 03:09 PM ISTUpdated : May 16, 2025, 03:12 PM IST
Hair Transplant करणे बेतले जिवावर, कानपूरमध्ये दोन इंजिनिअर्सचा हकनाक बळी

सार

कानपुरमधील एका क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांटनंतर दोन तरुणांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी हलगर्जीपणाचा आरोप केला असून पोलिस प्रकरणाची चौकशी करत आहेत.

कानपूर- डोक्यावर केस राहावे म्हणून उत्तर प्रदेशातील दोन तरुणांनी कानपुरमधील एका क्लिनिकचा दरवाजा ठोठावला. पण त्यांना काय माहीत होते की हा निर्णय त्यांच्या आयुष्यातील शेवटची चूक ठरेल. हेअर ट्रान्सप्लांटनंतर वेदना आणि सूज यामुळे त्यांना चक्क आपला जीव गमवावा लागला आहे. आता त्यांचे नातलग न्यायाची याचना करत आहेत.

कानपुरमधील एका खाजगी क्लिनिकमध्ये हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या दोन इंजिनिअर्सच्या मृत्युने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. डॉक्टर अनुपमा तिवारी यांच्या या क्लिनिकवर आता प्रश्नांचा भडीमार होत आहे.

पहिले प्रकरण: मयंक कटियारच्या मृत्युने प्रथम हलगर्जीपणाचा पर्दाफाश

मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी असलेले इंजिनिअर मयंक कटियार यांनी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी हेअर ट्रान्सप्लांट केले. शस्त्रक्रियेच्या काही तासांनंतरच मयंकला तीव्र वेदना आणि सूज येऊ लागली. प्रकृती इतकी बिघडली की दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १९ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबियांनी सुरुवातीला हा नैसर्गिंक मृत्यू वाटला होता. पण कालांतराने सत्य समोर येऊ लागले.

दुसरे प्रकरण: मार्चमध्ये विनीत दुबेचा गेला जीव

याच क्लिनिकमध्ये विनीत दुबे नावाच्या आणखी एका इंजिनिअरने १४ मार्च रोजी हेअर ट्रान्सप्लांट केले. पण काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. विनीत यांच्या पत्नी जया दुबे यांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेत कानपुर पोलिसांत तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कुटुंबीयांचा आरोप: परवाना आणि अनुभव नसताना चालवत होते क्लिनिक

दोन्ही पीडित कुटुंबीयांचा दावा आहे की डॉक्टर अनुष्का तिवारी यांच्याकडे अशा प्रकारची शस्त्रक्रिया करण्याचा योग्य परवाना किंवा अनुभव नव्हता. क्लिनिकमध्ये कोणत्याही प्रकारची आणीबाणीची सुविधाही उपलब्ध नव्हती. विनीतच्या कुटुंबियांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले…

पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता क्लिनिकचे सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय नोंदी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी केली जात आहे. सध्या क्लिनिक बंद करण्यात आले असून इतर रुग्णांसोबतही असा हलगर्जीपणा झाला आहे का, याची चौकशी सुरू आहे.

PREV

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती