गुजरातच्या राजकोटमधील एका गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
गुजरातच्या राजकोटमधील कालावड रोडजवळील टीआरपी गेम झोनला भीषण आग लागल्याची घटना आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही घटना शनिवारी दिनांक 25 घडली आहे. आग कशामुळे लागली याबाबत आम्ही तपास करत असल्याचे राजकोटच्या पोलीस कमिशनर यांनी सांगितले आहे. शिवाय शहरातील सर्व गेमिंग झोन बंद करण्याचे आदेशही पोलीस कमिश्नरांनी दिली आहेत.
गेम झोन जळून खाक
गेमझोनला लागलेल्या आगीत 20 जणांचा मृत्यू झाला असला तरी अनेकांना वाचवण्यात यश आले आहे. गेम झोनमध्ये अजूनही अनेक लोक अडकले असल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण गेम झोन जळून खाक झाले आहे. पोलीस कमिशनर राजीव भार्गव आणि जिल्हाधिकारी आनंदर पटेल घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेम झोनपासून 5 किलोमीटर दूरपर्यंत आगीचे लोट
आग लागल्यानंतर सर्वत्र धुराचे लोट पाहायला मिळत आहेत. गेम झोनच्या आगीचे लोट 5 किलोमीटर अंतरापर्यंत दूर पसरले आहेत. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.
आणखी वाचा:
India Weather : उत्तर भारतात उष्णतेची लाट, 'हे' शहर सर्वात उष्ण
PM Kisan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएम किसानचा या तारखेला जमा होणार 17 वा हप्ता