
एका गुजराथी कुटुंबाने ट्रेनच्या 3AC डब्यालाच किचन बनवलं आणि तिथेच सँडविच बनवायला सुरुवात केली. हा अनोखा प्रकार दाखवणारा व्हायरल व्हिडिओ सध्या चर्चेत आहे, ज्यावर लोक कुटुंबाच्या स्वच्छतेच्या सवयी आणि नागरी भान याबद्दल प्रश्न विचारत आहेत.
व्हिडिओमध्ये हे कुटुंब 3AC कोचच्या मधल्या बर्थ आणि आजूबाजूच्या सीटवर बसल्याचं दिसतंय. त्यांनी त्या जागेचा वापर जणू काही फूड काउंटरसारखाच केला. बर्थवर पेपर पसरून, अनेक महिला ग्रुपसाठी सँडविच बनवताना दिसत आहेत. त्या ब्रेडचे तुकडे ठेवतात, कापलेल्या भाज्या टाकतात, चटणी लावतात आणि अगदी काळजीपूर्वक सँडविच तयार करतात. जणू काही ट्रेनचा डबा म्हणजे त्यांच्या किचनचा ओटाच आहे.
I can't defend my gujarat 😭🤦
This family of surat posted on Instagram that they were travelling in 3AC compartment
They're making food on middle berth even this lady is saying that we could have bring electric toaster for making sandwiches https://t.co/7Jt4dGtQ68
— તીખો ઘુઘરો #̢̛ͥ̀̽̽ͨ̌̓͆̇̀̽ͦͨͫͯ̏̎̇̈̚͜҉̕͢͏͡҉̸̶̛͢͡ (@7Npatel) November 10, 2026
जेव्हा कुटुंब सँडविच तयार करत होतं, तेव्हा त्यातल्या एका महिलेने म्हटलं की, ते सोबत इलेक्ट्रिक टोस्टर पण आणू शकले असते. तिने सुचवलं की, ते सँडविच ग्रिल पण करू शकले असते.
या घटनेमुळे सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही जणांना हा जुगाड मजेशीर वाटला, तर अनेकांनी पॅसेंजर बर्थला पर्सनल कुकिंग स्टेशन बनवल्याबद्दल कुटुंबावर टीका केली. काहींनी असाही प्रश्न विचारला की, हे सर्व सोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी योग्य आहे का? ज्यांना हीच मर्यादित जागा शेअर करावी लागते.
रेल्वे कायदा, 1989 आणि रेल्वेच्या सुरक्षिततेच्या नियमांनुसार ट्रेनच्या डब्यात जेवण बनवण्यास बंदी आहे. आग लागण्याचा धोका आणि मर्यादित जागेत होणारे इतर संभाव्य धोके टाळण्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले आहेत, कारण तिथे प्रवासी, सामान आणि इलेक्ट्रिक उपकरणं खूप जवळ-जवळ असतात.
इलेक्ट्रिक टोस्टरमुळे आणखी धोका निर्माण होऊ शकतो, विशेषत: जेव्हा कोचच्या पॉवर सप्लायला कोणतंही अनधिकृत हीटिंग उपकरण जोडलं जातं. ट्रेनचे डबे किचनसारखे वापरण्यासाठी डिझाइन केलेले नसतात आणि जेवण बनवण्यासाठी इलेक्ट्रिकल उपकरणांचा वापर केल्याने इतर प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो.