
Kharif Crops MSP: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय कॅबिनेट बैठकीत उत्पादन खर्चापेक्षा 50 टक्के जास्त MSP देण्याचा निर्णय घेण्यात आला. खरीफ हंगामातील पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजात सूट देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
पीक आणि MSP (प्रति क्विंटल)
धान (सामान्य)-२३६९ रुपये
धान (ग्रेड ए)- २३८९ रुपये
ज्वार (हायब्रिड)- ३६९९ रुपये
ज्वार (मलडांडी)- ३७४९ रुपये
बाजरा- २७७५ रुपये
रागी- ४८८६ रुपये
मक्का- २४०० रुपये
अरहर- ८००० रुपये
मूंग- ८७६८ रुपये
उरद- ७८०० रुपये
कपास (मध्यम)- ७७१० रुपये
कपास (लांबा)- ८११० रुपये
मूंगफळी- ७२६३ रुपये
सूर्यफूल- ७७२१ रुपये
सोयाबीन- ५३२८ रुपये
तीळ- ९८४६ रुपये
नायजर सीड्स- ९५३७ रुपये
केंद्रीय कॅबिनेटने शेतकऱ्यांना कर्जावरील व्याजात १५,६४२ कोटी रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ही सूट किसान क्रेडिट कार्डद्वारे मिळणाऱ्या कर्जावर दिली जाईल. किसान क्रेडिट कार्डवरून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. यावर ७ टक्के वार्षिक व्याजदर आकारला जातो. शेतकऱ्याला सुमारे ४ टक्के वार्षिक व्याज भरावे लागते. सरकार १.५ टक्के व्याज सूट देते. वेळेवर कर्ज फेडल्यास शेतकऱ्यांना ३ टक्के वार्षिक व्याजदर लागू होतो.