
मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात शुक्रवारी, 28 नोव्हेंबर रोजी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जोरदार वाढ पाहायला मिळाली. काही काळ घसरणीनंतर स्वस्त दरात खरेदी सुरू झाल्याने ही रिकव्हरी झाली. या वाढीमध्ये सोन्यापेक्षा चांदी पुढे राहिली असून, दोन्ही बाजारात चांदीने मोठी उसळी घेतली. जागतिक आर्थिक घडामोडी आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून आणखी एका व्याजदर वाढीच्या शक्यतेचा अंदाज घेत, गुंतवणूकदारांचे लक्ष या मौल्यवान धातूंकडे कायम आहे.
bullion.com च्या ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी 28 नोव्हेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,26,000 रुपये होता, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,15,500 रुपये होता. तसेच चांदीचा दर 1,53,640 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला. दरम्यान, वीकेंडमुळे शनिवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) बंद होते.
शुक्रवारी MCX वर डिसेंबर महिन्याचे सोने फ्युचर्स जवळपास 2.4% ने वाढून 1,25,198 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. डिसेंबर चांदी फ्युचर्सने याहून चांगली कामगिरी करत 4.4% ची झेप घेतली आणि दर 1,52,322 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला.
आंतरराष्ट्रीय बाजारात, कॉमेक्स गोल्ड फ्युचर्स 3.23% ने वाढून $3,650 प्रति औंस झाले, तर चांदीचे फ्युचर्स जवळपास 7.92% ने झेपावत $43.23 प्रति औंसवर पोहोचले.
अमेरिकन डॉलर मजबूत होत असताना आणि डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्हकडून आणखी एका व्याजदर वाढीची अपेक्षा वाढत असतानाही ही रिकव्हरी पाहायला मिळाली. अलीकडच्या घसरणीनंतर कमी दरात खरेदी वाढल्याने या दोन्ही मौल्यवान धातूंच्या मागणीला आधार मिळाला.
बुलियन मार्केटच्या पुढील वाटचालीसाठी गुंतवणूकदार आता जागतिक आर्थिक घडामोडी आणि अमेरिकेच्या चलनविषयक धोरणांच्या संकेतांवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.