
Gold Price Today : सोन्याला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. खासकरुन भारतातील लग्नसोहळ्यांमध्ये सोन्याचा अधिक महत्व दिले जाते. गेल्या अनेक पिढ्यांपासून ते आतापर्यंतच्या पिढीला परंपरांगत सोन्याची ज्वेलरी दिली जाते. खरंतर, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्यात गुंतवणूक करणे फार सुरक्षित मानले जाते.
सध्याची स्थिती पाहता जगभरात आर्थिक उलाढालींसह काही ठिकाणी सुरू असणारे युद्ध आणि आर्थिक मंदीची भीती आहे. गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याचे दर कमी-अधिक होताना दिसून येत आहेत. भारतातील प्रमुख शहरे मुंबई, दिल्ली आणि कोलकातासारख्या ठिकाणी आजचे सोन्याचे दर काय आहेत हे जाणून घेऊया.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोनं 9,618 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोनं 8,816 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोनं 7,214 प्रति ग्रॅम रुपये आहे.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोनं 9,633 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोनं 8,831 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोनं 7,266 प्रति ग्रॅम रुपये आहे.
कोलकाता
कोलकाता येथे 24 कॅरेट सोनं 9,618 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोनं 8,816 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोनं 7,214 प्रति ग्रॅम रुपये आहे.
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोनं 9,621 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोनं 8,819 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोनं 7,217 प्रति ग्रॅम रुपयांवर पोहोचले आहे.
अहमदाबाद
अहमदाबाद येथे 24 कॅरेट सोनं 9,623 प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोनं 8,821 प्रति ग्रॅम आणि 18 कॅरेट सोनं 7,218 प्रति ग्रॅमवर रुपयांवर पोहोचले आहे.
शुद्ध सोनं कसे ओखळावे?