Liquor Ban : ब्रँडेड दारूही खरी नाहीये, 'ओल्ड मंक', 'रॉयल चॅलेंज'वर बंदी? FSSAI च्या कारवाईने मद्यप्रेमींना धक्का

Published : Aug 04, 2026, 10:37 PM IST

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) मद्यप्रेमींना मोठा धक्का दिला आहे. ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज आणि बॅगपायपरसारख्या प्रसिद्ध ब्रँड्सच्या काही प्रकारांवर बंदी घातली आहे. यामागे नेमकं काय कारण आहे?

PREV
15
आपण पितोय ती खरी दारू आहे का? ओल्ड मंक, बॅगपायपर, रॉयल चॅलेंजचा मोठा घोटाळा

देशातील कोट्यवधी लोकांच्या पसंतीच्या दारू ब्रँड्सना भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) अनपेक्षित धक्का दिला आहे. ओल्ड मंक, रॉयल चॅलेंज, बॅगपायपर आणि अँटिक्विटी ब्लू यांसारख्या मोठ्या ब्रँड्सच्या काही विशिष्ट प्रकारच्या दारूच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दारू बनवताना गुणवत्तेचे नियम न पाळणं आणि त्यात कृत्रिम फ्लेवर्स मिसळणं हे या बंदीमागील मुख्य कारण आहे. FSSAI ने केलेल्या लॅब टेस्टमध्ये या कंपन्या ग्राहकांची फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे.

25
लॅब टेस्टमध्ये नेमकं काय उघड झालं?

चांगल्या प्रतीची व्हिस्की किंवा रम बनवण्यासाठी बराच वेळ लागतो. माल्ट, द्राक्षं किंवा उसाच्या मळीपासून आंबवून ती अनेक वर्षे नैसर्गिकरित्या मुरवली जाते. तेव्हाच तिला खरी चव आणि सुगंध येतो. पण या प्रसिद्ध कंपन्यांनी वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट शोधला. त्यांनी न्यूट्रल अल्कोहोलमध्ये बाहेरून कृत्रिम रम आणि व्हिस्कीचे फ्लेवर्स मिसळले. FSSAI च्या कायद्यानुसार, अशा प्रकारे कृत्रिम सुगंध मिसळणं हा गंभीर गुन्हा आहे.

35
कोणत्या ब्रँड्सवर आणि कुठे बंदी घालण्यात आली?

सध्या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही विशिष्ट उत्पादन युनिट्समध्ये तयार झालेल्या बॅचवर ही बंदी लागू झाली आहे. 

• युनायटेड स्पिरिट्स (मध्य प्रदेश): अँटिक्विटी ब्लू व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की. 

• इनब्रू बेव्हरेजेस (मध्य प्रदेश): बॅगपायपर डिलक्स व्हिस्की, ओल्ड कास्क डिलक्स नंबर रम. 

• मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर (महाराष्ट्र): देशातील अत्यंत लोकप्रिय ओल्ड मंक रमचे ३ प्रकार. 

याशिवाय मॅकडोवेल्स नंबर १ रम सारखी काही इतर उत्पादनंही तपासणीखाली आहेत. ही बंदी फक्त या प्लांटपुरती मर्यादित आहे की देशव्यापी लागू होणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

45
७ वर्षांच्या ओल्ड मंकच्या नावाखाली मोठी फसवणूक

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 'ओल्ड मंक नंबर रम' च्या बाटल्यांवर '7 इयर्स ओल्ड ब्लेंडेड' (7 वर्षे जुनी रम) असं लिहून विकलं जात होतं. पण FSSAI च्या लॅब टेस्टमध्ये असं आढळून आले की, त्यात ५ टक्क्यांपेक्षा कमी मूळ जुनी रम होती. उर्वरित ९५ टक्के भाग हा चवहीन न्यूट्रल स्पिरिट होता. अशाप्रकारे चुकीची माहिती देऊन ग्राहकांची फसवणूक करणं हे 'फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स (लेबलिंग अँड डिस्प्ले) रेग्युलेशन, 2020' चं उल्लंघन आहे. जर कृत्रिम फ्लेवर्स मिसळले असतील, तर बाटलीवर 'रम फ्लेवर्ड स्पिरिट' किंवा 'व्हिस्की फ्लेवर्ड स्पिरिट' असं स्पष्ट लिहिण्याचे आदेश FSSAI ने दिले आहेत.

55
३.३ लाख कोटींच्या मार्केटला इशारा

भारतात दारूचा व्यवसाय खूप मोठा आहे. देशात वर्षाला सुमारे ४० अब्ज डॉलर्स (अंदाजे ३.३ लाख कोटी रुपये) किमतीची दारू विकली जाते. डियाजिओ इंडिया (युनायटेड स्पिरिट्स) आणि Pernod Ricard सारख्या जागतिक कंपन्यांचं इथे वर्चस्व आहे. बंदी घातलेले ब्रँड्स भारतातच तयार होत असल्याने ते आयातीत स्कॉचपेक्षा स्वस्त मिळतात. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि तरुण वर्गात ते जास्त लोकप्रिय आहेत. FSSAI ने स्पष्ट केलं आहे की ही कारवाई संपूर्ण उद्योगाविरोधात नसून, नियम तोडणाऱ्या कंपन्यांवर आहे. गोव्यातील मॅन्डेट्सी डिस्टिलरीजसह महाराष्ट्रातील इतर सहा कंपन्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories