
भारतात कार खरेदी करताना लोक मजबूत बांधणी, एअरबॅग्ज आणि आधुनिक सुरक्षा फीचर्सवर भर देत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे भारतीय बाजारात 10 लाखांपेक्षा कमी किमतीच्या कारलाही आता 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळत आहे. हे रेटिंग ग्लोबल NCAP आणि भारत NCAP सारख्या क्रॅश-टेस्टिंग एजन्सीकडून दिले जाते, जे कारची मजबुती आणि प्रवाशांच्या सुरक्षेचे मूल्यांकन करतात. चला, भारतातील 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेल्या पाच परवडणाऱ्या कार कोणत्या या बद्दल जाणून घेऊया.
या कॉम्पॅक्ट एसयूव्हीला भारत NCAP क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यामध्ये सहा एअरबॅग्ज, ADAS आणि मजबूत स्ट्रक्चरसारखे आधुनिक सेफ्टी फीचर्स आहेत. महिंद्रा XUV 3XO शहरी आणि हायवे वापरासाठी एक सुरक्षित आणि आधुनिक एसयूव्ही मानली जाते.
ही भारतातील सर्वात स्वस्त 5-स्टार सेफ्टी-रेटेड कारपैकी एक आहे. मॅग्नाइटला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये फाईव्ह-स्टार रेटिंग मिळाले आहे. ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही असूनही, यात मजबूत बॉडी स्ट्रक्चर, सहा एअरबॅग्ज, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि आवश्यक सेफ्टी फीचर्स आहेत. त्यामुळे बजेटमध्ये सुरक्षित एसयूव्ही शोधणाऱ्यांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
फाईव्ह-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणाऱ्या पहिल्या मारुती कारपैकी ही एक आहे. डिझायरला भारत NCAP आणि ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये उत्कृष्ट रेटिंग मिळाले आहे. सेडान सेगमेंटमध्ये ही कार सुरक्षा, आराम आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. यात सहा एअरबॅग्ज, ईएससी, आयसोफिक्स चाइल्ड सीट माउंट्स आणि मजबूत बॉडी स्ट्रक्चर आहे.
सुरक्षेच्या बाबतीत टाटा नेक्सॉन हे आधीपासूनच एक विश्वासार्ह नाव आहे. या कारला ग्लोबल NCAP आणि भारत NCAP कडून फाईव्ह-स्टार रेटिंग मिळाले आहे. तिची मजबूत बिल्ड क्वालिटी, स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आणि एसयूव्ही स्टाईल रोड प्रेझेन्समुळे ही एक लोकप्रिय फॅमिली कार बनली आहे.
स्कोडाच्या या परवडणाऱ्या एसयूव्हीला फाईव्ह-स्टार भारत NCAP रेटिंग मिळाले आहे. युरोपियन बिल्ड क्वालिटी, उत्तम सुरक्षा आणि ड्रायव्हिंगमधील स्थिरता ही तिची सर्वात मोठी ताकद आहे.