
कन्नूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या एका भाजप नेत्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कन्नूर टाऊन पोलिसांनी भाजपचे क्षेत्रीय अध्यक्ष के. श्रीकांत यांच्यावर ही कारवाई केली आहे.
कन्नूरमधील स्टेडियमबाहेर भाजपची एक जाहीर सभा सुरू होती. या सभेत भाषण करताना के. श्रीकांत यांनी राहुल गांधींची तुलना थेट भटक्या कुत्र्याशी केली. एवढंच नाही, तर राहुल गांधी हे ध्येय नसलेल्या एखाद्या वेड्या माणसासारखे फिरत असतात, असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं. या आक्षेपार्ह विधानांनंतर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.