Facebook Down : फेसबुक अचानक ठप्प, भारतासह जगभरात बंद झालं

Published : Jul 19, 2026, 02:51 PM ISTUpdated : Jul 19, 2026, 02:56 PM IST
Facebook Down

सार

Facebook Down India : भारतासह जगभरात फेसबुक डाऊन झालं आहे. फेसबुकवर युजर्सला Account Temporarily Unavailable असा मेसेज येतो आहे. अनेक युजर्सनी याबाबत तक्रारी दिल्या आहेत.

नवी दिल्ली : मागील जवळपास एक तासापासून फेसबुक बंद पडलं आहे. केवळ तुमच्याकडे तुमचं फेसबुक सुरू होत नाही असं वाटत असेल. मात्र भारतातसह जगभरातील लाखो फेसबुक युजर्सचं फेसबुक जवळपास दुपारी १ पासून बंद आहे. फेसबुक लॉगइन करताना, वेबसाइट सुरू आणि Facebook App ओपन करताना युजर्सना अडचणी येत आहेत.

भारतासह जगभरात फेसबुक बंद

मिळालेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी फेसबुकबाबत तक्रारी आल्या. युजर्सकडून फेसबुक सुरू होत असल्याचं विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सांगण्यात आलं. अचानक फेसबुक बंद पडल्याने युजर्स संभ्रमात पडले आहेत. युजर्सने न्यूज फीड अपडेट होत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. 

स्क्रिनवर टेम्पररी अकाऊंट उपलब्ध नसल्याचा मेसेज

फेसबुक लॉगइन केल्यानंतर Account Temporarily Unavailable असा मेसेज स्क्रिनवर दिसतो. त्यापुढे असंही लिहिलं आहे, की काही साइटवरील तांत्रिक समस्येमुळे सध्या अकाऊंट सुरू नाही. ही समस्या लवकरच सोडवली जाईल. काही मिनिटांनी पुन्हा प्रयत्न करा, अशा आशयाचा मेसेज पांढऱ्या स्क्रिनवर दिसतो आहे. त्यावर इतर काहीही माहिती दिली गेलेली नाही.

DownDetector या वेबसाइटवर फेसबुक सुरू होत नसल्याच्या तक्रारींमध्ये अचानक वाढ झाली. या वेबसाइटनुसार अमेरिकेत पहाटे जवळपास साडेतीनच्या सुमारास फेसबुकबाबत या तक्रारी आल्या. तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी जवळपास १ वाजण्याच्या सुमारास फेसबुक सुरू होत नसल्याचं समोर आलं.

मेटाकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही

फेसबुक बंद झालं आहे किंवा फेसबुकमधील टेक्निकल समस्येबाबत मेटाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये कंपनी अधिकृत माहिती, किंवा समस्येबाबत चौकशी केल्यानंतरच माहिती देते. मात्र फेसबुकची कंपनी मेटाकडून आतापर्यंत कोणतीही तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणांबाबत माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, ही समस्या सर्व्हर संबंधी असू शकते. त्यामुळे युजर्सनी फेसबुक बंद झालं असल्याने पासवर्ड बदलणं किंवा फोन रिस्टार्ट करणं अशा कोणत्याही गोष्टी करू नका, अशी माहिती सोशल मीडियाद्वारे दिली जात आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

मनोज जरांगे पाटील : धर्मेंद्र प्रधान हटवा | NEET | StudentProtest | SonamWangchuk | CJPProtest
संजय निरुपम : NEET आंदोलन विद्यार्थ्यांचे नाही, राजकारण सुरू | NEET | PaperLeak | CJPProtest