बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुखला नेमके काय झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक प्रकृती खालावल्यामुळे शाहरुखला अहमदाबाद येथील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची प्रकृती अचानक खालावली आहे. उन्हामुळे डीहायड्रेशन झाल्यामुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार केल्यानंतर शाहरुखला दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शाहरुखच्या कुटुंबीयांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
चाहत्यांनी व्यक्त केली चिंता
शाहरुख खान रुग्णालयात दाखल होताच चाहत्यांमध्ये चिंत्तेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चिंता व्यक्त केली आहे. एका यूजरने 'बापरे अचानक शाहरुखला काय झाले? त्याची प्रकृती आता कशी आहे' अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने 'किंग खान लवकर बरा हो' असे म्हटले आहे.
शाहरुखच्या चित्रपटांविषयी
शाहरुख खानच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले तर त्याचा 'डंकी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने हवी तशी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. पण जवान आणि पठाण हे दोन्हीही शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसले.