लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. इंडिया आघाडीला 234 जागा जिंकल्या. अन्यच्या खात्यात 17 जागा गेल्या. आता या अन्य 17 खासदारांचा रोल सुद्धा महत्त्वाचा बनला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये भाजपाला 240 जागांवर विजय मिळाला आहे. एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीय. एनडीएला यावेळी इंडिया आघाडीने चांगली टक्कर दिली. त्यांनी 234 जागा जिंकल्या. अन्यच्या खात्यात 17 जागा गेल्या. आता या अन्य 17 खासदारांचा रोल सुद्धा महत्त्वाचा बनला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल जाहीर झालाय. यावेळी एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीय. भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीला 292 जागा मिळाल्या आहेत. 272 या बहुमताच्या मॅजिक फिगरपेक्षा त्यांच्याकडे जास्त खासदार आहेत. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीकडे 234 खासदार आहेत. अशावेळी सगळ्यांच्या नजरा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांच्याकडे लागल्या आहेत. जेडीयूकडे 12 आणि टीडीपीकडे 16 खासदार आहेत. दोघांचे मिळून 28 खासदार होतात. सध्याच्या परिस्थितीत हा आकडा खूप महत्त्वपूर्ण आहे. नजर फक्त या दोन पक्षांवरच नाहीय, तर ते अपक्ष खासदार आणि पक्ष सुद्धा महत्त्वाचे आहेत, जे एनडीए आणि इंडिया आघाडी दोघांचा भाग नाहीयत. अशा खासदारांची संख्या 17 आहे. सरकारच भविष्य निश्चित करण्यात या खासदारांची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. हे खासदार कोण आहेत ते जाणून घ्या.
खासदार पक्ष
पप्पू यादव अपक्ष
ओवैसी AIMIM
चंद्रशेखर आजाद आजाद समाज पार्टी (कांशीराम)
सबरजीत सिंह खालसा अपक्ष
अमृतपाल सिंह अपक्ष
विशाल पाटील अपक्ष
इंजीनियर राशिद अपक्ष
पटेल उमेशभाई अपक्ष
मोहम्मद हनीफा अपक्ष
रिकी एन्ड्रयू पीपुल्स पार्टी
रिचर्ड वानलालहमंगइहा सझोरम पीपुल्स मुवमेंट
हरसिमरत कौर बादल शिरोमणि अकाली दल
पेद्दीरेड्डी वेंकट मिधुन रेड्डी YSRCP
अविनाश रेड्डी YSRCP
थानुज रानी YSRCP
गुरुमूर्ती मैडिला YSRCP
जोयंता बसुमतारी UPPL