व्हॉट्सॲप चॅटमुळे झाला ज्योती मल्होत्राचा भांडाफोड, गुप्त संपर्काचं जाळं आलं समोर

Published : May 21, 2025, 03:21 PM ISTUpdated : May 21, 2025, 04:39 PM IST
Jyoti malhotra

सार

ज्योती मल्होत्रा आणि पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यामधील नवीन व्हॉट्सॲप चॅट लीक झाल्याने खळबळ उडाली आहे. या चॅटमध्ये संदिग्ध फोटो, लोकेशन आणि कोडवर्ड्स आढळून आल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

भारतीय महिला ज्योती मल्होत्रा हिच्या पाकिस्तानच्या आयएसआय (ISI) अधिकाऱ्यासोबतच्या संबंधांचा नवा पुरावा समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला नवीन वैयक्तिक व्हॉट्सॲप चॅट हाती लागताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. या संभाषणामुळे, केवळ मैत्रीपुरता सीमित संबंध नसून, गंभीर राष्ट्रीय सुरक्षेचा भाग असलेल्या माहितीचा आदान-प्रदान झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

'अली हसन' हा केवळ नावापुरता मित्र? या प्रकरणातील 'अली हसन' हा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा (ISI) अधिकारी असल्याचे आधीच उघड झाले आहे. आता मिळालेल्या नवीन चॅटमध्ये काही संदिग्ध फोटो, लोकेशन आणि कोडवर्ड्ससारखी माहिती शेअर झाल्याचे स्पष्ट होत आहे.

बॉर्डरच्या पलिकडचं ‘ऑपरेशन’? चॅटमधून हे स्पष्ट होतं की, संवाद केवळ वैयक्तिक न राहता, त्यामध्ये देशहितास धोका पोहोचवणाऱ्या मुद्द्यांचा समावेश होता. ‘काय झाले त्याच्यावर?’, ‘पुढची वेळ कोणती?’ अशा प्रकारचे संवाद देशांतर्गत हालचालींवर लक्ष असल्याचं सूचित करतात.

काही महिन्यांपासून संशयाच्या भोवऱ्यात ज्योती मल्होत्रा हिच्यावर काही महिन्यांपूर्वी गुप्त माहिती पाकिस्तानला देण्याच्या आरोपांमुळे तपास सुरु झाला होता. मात्र आता नव्या पुराव्यामुळे ही केवळ ‘मैत्री’ नव्हे, तर ठरवून रचलेले 'हनीट्रॅप ऑपरेशन' असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्रीय यंत्रणा सक्रिय, तपास वेगात गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार गुप्तचर विभाग (Intelligence Bureau) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) या प्रकरणाची बारकाईने चौकशी करत आहेत. ज्योतीने कोणती माहिती लीक केली? कोणी तिला मदत केली? – याच्या तपासासाठी तिचे डिजिटल उपकरण, बँक व्यवहार, परदेश दौरे इ. तपासले जात आहेत.

राजकीय प्रतिक्रिया : “देशद्रोह्यांवर कठोर कारवाई व्हावी” सत्ताधाऱ्यांकडून आणि विरोधकांकडूनही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत “देशद्रोह्यांना माफ करू नका”, अशी मागणी केली आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

प्रवाशांची गैरसोय करणाऱ्या IndiGo वर कठोर कारवाई होणार, सरकारचा संसदेत इशारा!
कॅब ड्रायव्हर आणि त्याच्या मित्रांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार, तपासात मात्र मोठा ट्विस्ट उघडकीस!