Tiranga Yatra: तिरंगा यात्रेपूर्वी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; अभिजित दीपके आणि नेहा बोरा ताब्यात

vivek panmand   | CMS
Published : Oct 16, 2026, 06:01 PM IST
dipake

सार

कॉकरोच जनता पार्टीच्या तिरंगा यात्रेपूर्वीच दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी सीजेपी नेते अभिजित दीपके आणि नेहा बोरा यांना ताब्यात घेतलं. यानंतर कार्यकर्त्यांनी हातात तिरंगा घेऊन जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.

दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीने (CJP) तिरंगा यात्रेची हाक दिली होती. पण या यात्रेपूर्वीच दिल्ली पोलिसांनी वेगाने सूत्रे हलवली. पोलिसांनी तिरंगा यात्रेसाठी पोहोचलेले सीजेपी नेते अभिजित दीपके यांना ताब्यात घेतलं. या कारवाईनंतर कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन जोरदार निदर्शने सुरू केली. कार्यकर्ते सौरभ भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करत आहेत. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी नेहा बोरा यांनाही बळजबरीने ताब्यात घेतलं.

सीजेपीने आपल्या कार्यकर्त्यांना पाचपेक्षा कमी लोकांच्या गटाने कॅनॉट प्लेस (CP) येथे पोहोचण्याच्या सूचना दिल्या होत्या. तिथे राष्ट्रध्वज फडकवून फोटो काढायचा आणि त्यानंतर तिथून निघून जायचं, असा त्यांचा प्लॅन होता. राष्ट्रध्वज फडकवणे हा गुन्हा नाही, हे दाखवून देण्याचा त्यांचा उद्देश होता. पण पोलिसांनी अभिजित दीपके तिरंगा यात्रेत सहभागी होण्यासाठी पोहोचताच त्यांना लगेच ताब्यात घेतलं.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Netflix Stock: नेटफ्लिक्समध्ये मोठा बदल, शेअरच्या टार्गेट प्राईसमध्ये कपात
Ration Card e-KYC: ४ दिवसांत ई-केवायसी करा, नाहीतर रेशन बंद! मोबाईलवरच असं करा अपडेट