Delhi AQI : दिवाळीनंतर दिल्लीत हवा प्रदूषण गंभीर; ही काळजी घ्या

Published : Nov 09, 2026, 08:29 AM IST
Delhi AQI After Diwali

सार

देशाच्या राजधानीत हवा प्रदूषण पुन्हा एकदा वाढलंय. शहरातील हवा प्रदूषणाची पातळी अतिशय धोकादायक स्थितीत पोहोचली आहे. काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 च्या पुढे गेलाय.

नवी दिल्ली : दिवाळी साजरी केल्यानंतर दिल्लीत हवा प्रदूषण अतिशय धोकादायक स्थितीत पोहोचलंय. काही भागात हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 400 च्या पुढे गेलाय. सोमवारी पहाटे शहराच्या अनेक भागात दाट धुक्याची चादर पसरली होती. यामुळे दृश्यमानतेवर मोठा परिणाम झाला. कोर्टाचा आदेश असतानाही शहरात अनेक ठिकाणी फटाके फोडण्यात आले. यामुळेच परिस्थिती आणखी बिघडली आहे. राज्य सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं सांगण्यात आलंय.

हवेची गुणवत्ता खालावल्यास कोणती काळजी घ्यावी?

  1. अत्यंत महत्त्वाचं काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका.
  2. बाहेरचा व्यायाम आणि मॉर्निंग वॉक पूर्णपणे टाळा.
  3. बाहेर जावंच लागलं तर N95 मास्कचा आवर्जून वापर करा.
  4. बाहेरचं प्रदूषण आत येऊ नये म्हणून घराच्या खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवा.
  5. हवा स्वच्छ करण्यासाठी घरात एअर प्युरिफायरचा वापर करा.
  6. श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा इतर कोणताही त्रास जाणवत असेल, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

India Travel: 'भारत म्हणजे इथली माणसं, फक्त ठिकाणं नाही'; एका वर्षाच्या मुक्कामानंतर परदेशी पर्यटकाचा भावुक करणारा व्हिडिओ
Sanjay Shirsat | शिंदेंच्या आदेशावर संजय शिरसाटांचं वक्तव्य