डेहराडूनमध्ये भीषण अपघात, 6 विद्यार्थ्यांचा मृत्यू

डेहराडूनच्या ओएनजीसी चौकात झालेल्या भीषण अपघातात इनोव्हा कारमधील सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सहलीला जात असताना वेगात असलेली इनोव्हा कार ट्रकला धडकली.

डेहराडून . कॉलेजचे विद्यार्थी इनोव्हा कारमधून प्रवास करत असताना भीषण अपघात झाला. एकूण ७ विद्यार्थी इनोव्हा कारमधून प्रवास करत होते. या अपघातात तीन विद्यार्थिनी आणि तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. आणखी एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. ही घटना डेहराडूनच्या ओएनजीसी चौकात घडली. जखमी विद्यार्थ्याला सिनर्जी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विद्यार्थी सहलीला जात असताना हा अपघात झाला असे सांगण्यात येत आहे. वेगात असलेली इनोव्हा कार ट्रकला धडकली. अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. माहिती मिळताच कॅन्टोन्मेंट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कैलाश सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज जमा करण्यात आले आहेत आणि तपास सुरू आहे.

मृत विद्यार्थ्यांची नावे गुनीत (१९), कामाक्षी (२०), नव्या गोयल (२३), ऋषभ जैन (२४), कुणाल कुकरेजा (२३) आणि अतुल अग्रवाल (२४) अशी आहेत. गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव सिद्धेश अग्रवाल आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगात येणाऱ्या ट्रकने कारला धडक दिली. ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असे स्थानिकांचे म्हणणे आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला होता.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पळून गेलेल्या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत आणि जखमी विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची माहिती कॉलेजकडून मिळवण्यात आली आहे आणि त्यांना कळवण्यात आले आहे.

बस अपघातात १२ जणांचा मृत्यू :  नोव्हेंबर ११ रोजी उत्तर प्रदेशातील गुलाबपूर गावात बसचा अपघात झाला. यात १२ जणांचा मृत्यू झाला. लग्नाला जाणाऱ्या कुटुंबीयांची बस नियंत्रण गमावून अपघातग्रस्त झाली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.
 

Share this article