Indian Cricket Team Updates: मुंबईकर रोहित अन् सूर्यकुमारचा दिल्लीत गणपती डान्स, बसमधून उतरताच धरला ठेका; फुगडीही घातली

Published : Jul 04, 2024, 11:21 AM ISTUpdated : Jul 04, 2024, 11:25 AM IST
Indian Cricket Team Updates

सार

Indian Cricket Team Updates: टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते.

Indian Cricket Team Updates: टी-20 विश्वचषक 2024 ची (T20 World Cup 2024) स्पर्धा जिंकून टीम इंडिया (Indian Cricket Team) गुरुवारी मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ गुरुवारी (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

टीम इंडिया विमानतळावरून हॉटेलमध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच अनेक चाहते तिथे उपस्थित होते. हॉटेलच्या गेटवर चाहत्यांनी रोहित शर्मासह सर्व खेळाडूंचा स्वागत केले. यावेळी बस हॉटेल बाहेर पोहताच रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांनी डान्स केला. यावेळी सूर्यकुमार मुंबईकर असल्याने त्याने मुंबई स्टाईल गणपती डान्स केल्याची प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

 

 

टीम इंडियाचे खेळाडू आता दिल्लीतील आयटीसी मौर्य या हॉटेलमध्ये काहीवेळ विश्रांती घेतील. त्यानंतर भारतीय खेळाडू साधारण 11च्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला जातील. त्यानंतर दुपारी 2 ते 3च्या सुमारास टीम इंडिया मुंबईत दाखल होईल. मुंबईत टीम इंडियाची विजयी यात्रा काढण्यात येणार आहे. टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवरही जाईल. याठिकाणी भारतीय संघाच्या स्वागतासाठी जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

बॅग उघडली, ट्रॉफीला एकटक पाहिलं, हसले अन्...

टीम इंडियाचं विमान भारतात दाखल होताच बीसीसीआयने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा दिसून येत आहे. हे सर्व खेळाडू एक बॅग उघडून विश्वचषकाची ट्रॉफी हातात घेऊन भारतात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे. या व्हिडीओला 'Its Home' असं कॅप्शन देण्यात आले आहे.

टीम इंडियाचे आजचे वेळापत्रक

सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट.

दुपारी 2 वाजता : मुंबईकडे रवाना.

सायंकाळी 5 वाजता : मरिन ड्राइव्हला आगमन,

सायंकाळी 5 वाजता : वानखेडे स्टेडियमच्या दिशेने बस परेड. सायंकाळी ७ वाजल्यापासून: वानखेडे स्टेडियमवर विजयी सोहळा

आणखी वाचा :

टीम इंडियाच्या T20 विश्वचषक 2024 चे यश साजरे करण्यासाठी बीसीसीआयने 4 जुलैला मुंबईत विजय परेडचे केले अनावरण

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department