सिलिंडरच्या किमतीत कपात, 1 डिसेंबरपासून लागू झाले नवे दर, वाचा मुंबईतील दर

Published : Dec 02, 2025, 03:30 PM IST

commercial LPG Gas Cylinder Price Reduced From December 1 : देशभरात व्यावसायीक गॅस स्वस्त झाला आहे. LPG सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 

PREV
15
व्यावसायीक गॅस स्वस्त

१ डिसेंबर (सोमवार) पासून देशभरात व्यावसायीक गॅस स्वस्त झाला आहे. LPG सिलिंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. मात्र, ही कपात सर्व प्रकारच्या सिलिंडरसाठी लागू नाही. या दरवाढीमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

25
व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी

१ डिसेंबर २०२५ रोजी व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १० रुपयांची कपात करण्यात आली आहे. याचा फायदा छोटे व्यावसायिक, रेस्टॉरंट व्यावसायिक आणि व्यावसायिक संस्थांना मिळेल. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

35
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात

हॉस्पिटॅलिटी (हॉटेल आणि रेस्टॉरंट) क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत आता दिल्लीत १,५८०.५० झाली आहे. ही सलग दुसऱ्या महिन्यातील कपात आहे. या कपातीमुळे ऑक्टोबर महिन्यात झालेल्या १५.५० च्या दरवाढीचा परिणाम काही प्रमाणात संतुलित झाला आहे.

45
इतर शहरांमधील दर

इंडियन ऑइलच्या अधिकृत वेबसाइटनुसार, १० रुपयांच्या कपातीनंतर, १ डिसेंबर २०२५ पासून दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर १५८०.५० रुपयांना मिळेल. पूर्वी त्याची किंमत १५९०.५० रुपये होती. दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ८५३ रुपये आहे. मुंबईत किंमत कमी होऊन १५३१.५० रुपये झाली आहे, तर चेन्नईत आता तो १७३९.५০ रुपयांना मिळेल.

55
किंमतींचा आढावा

देशातील सरकारी तेल विपणन कंपन्या - इंडियन ऑइल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम - दर महिन्याला किमतींचा आढावा घेतात. नवीन दर किंवा कोणताही बदल प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून लागू होतो. इंडियन ऑइल या आढाव्याचे नेतृत्व करते. विशेष म्हणजे डिसेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत.

Read more Photos on

Recommended Stories