UP चा Prajwal Revanna, भाजप नेत्याच्या मुलाचे 130 अश्लील व्हिडिओ व्हायरल, अनेक तरुणींसोबत होते संबंध

Published : May 31, 2025, 11:52 PM IST
UP चा Prajwal Revanna, भाजप नेत्याच्या मुलाचे 130 अश्लील व्हिडिओ व्हायरल, अनेक तरुणींसोबत होते संबंध

सार

भाजप नेत्याच्या मुलाचे कामकांड उघडकीस आले आहे. तब्बल १३० अश्लील व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर हे व्हिडिओ व्हायरल होताच खळबळ उडाली आहे.

लखनऊ - कायदा आणि सुव्यवस्था, बुलडोझर, गँगस्टरना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊन मोठी खळबळ उडवणाऱ्या उत्तर प्रदेशात आता कामकांडाने खळबळ उडवली आहे. मणिपुरी जिल्ह्याच्या महिला भाजप अध्यक्षा सीमा गुप्ता यांचा मुलगा शुभम गुप्ता याचे अश्लील व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तब्बल १३० व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. अनेक युवतींसोबतचे हे व्हिडिओ उत्तर प्रदेशात खळबळ उडवत आहेत.

मुलाचे कामकांड उघड

शुभम गुप्ता यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र, नाते तुटले होते. पत्नीशी नेहमी भांडण करणाऱ्या शुभम गुप्ताच्या त्रासाला कंटाळून आता पत्नीच पती शुभम विरोधात उभी राहिली आहे. गेल्या चार वर्षांपासून पत्नीला मारहाण, छळ करणाऱ्या शुभम गुप्ताने अलीकडेच पत्नीला सिगारेटने चटके दिले होते. याबाबत पत्नीने पोलिस ठाण्यात फोन करून तक्रार दिली होती. मात्र भाजप नेत्याचा मुलगा असल्याने हा प्रकार कुठेही उघडकीस आला नाही. पोलिसांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही, अशीही माहिती समोर आली आहे.

 

 

पत्नीला जबरदस्तीने व्हिडिओ दाखवला

गेल्या अनेक दिवसांपासून पत्नीला आपल्या अश्लील कृत्यांचे व्हिडिओ जबरदस्तीने दाखवत होता, असा आरोप पत्नीने केला आहे. मानसिक छळ करण्यासाठी हे अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने दाखवत होता. त्यामुळे त्याच्यापासून दूर जाण्यासाठी आणि मानसिक छळ सहन करण्यासाठी भाग पाडले. पतीला राजकीय पाठबळ असल्याने माझा लढा, तक्रार काहीच मान्य झाली नाही, असा आरोप पत्नीने केला आहे.

पत्नी आणि पतीमधील वाद उघडकीस आल्यानंतर त्याचे १३० व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अलीकडेच पतीने दुसऱ्या एका महिलेसोबत संबंध असल्याचे सांगितले होते, असा आरोप पत्नीने केला आहे. गर्लफ्रेंडसोबतचे व्हिडिओ पत्नीला दाखवून छळ केला. आता अचानक हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल कसे झाले या प्रश्नाचे उत्तर मिळालेले नाही. शुभम गुप्ताची नवीन गर्लफ्रेंडने हे व्हिडिओ व्हायरल केले असावेत, अशी चर्चा आहे.

 

 

महिला नेत्या संपर्काबाहेर

भाजप जिल्हाध्यक्षा सीमा गुप्ता हे व्हिडिओ व्हायरल होताच संपर्काबाहेर गेल्या आहेत. फोनवर नॉट रिचेबल झाल्या आहेत. कोणाच्याही संपर्कात नाहीत. शुभम गुप्ता बेपत्ता आहे. आता शुभम गुप्ताची पत्नी माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत आहे.

राजकीय खळबळ

या घटनेबाबत मणिपुरी जिल्हा भाजपने मौन बाळगले आहे. मात्र समाजवादी पक्ष, काँग्रेस, बहुजन समाज पक्षांसह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भाजप नेत्यांचे मुखवटे उतरत आहेत. हे सभ्य, शिस्तबद्ध नेत्यांचे खरे चेहरे आहेत, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष आलोक शाख्या यांनी दिली आहे. आता राजकीय संघर्षालाही हे मैदान झाले आहे. भाजपविरोधात विरोधी नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. भाजप नेते सत्तेचा वापर करून महिलांवर अत्याचार करत आहेत, असे आरोप होत आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

संसदेत ई-सिगारेट कोणी ओढली? खासदार अनुराग ठाकूर यांचा TMC वर गंभीर आरोप
या मंदिरात लग्न केल्यास होईल घटस्फोट, या मंदिरातील लग्नांवर लावण्यात आली बंदी!