दिल्ली : प्रियंका गांधी यांनी मालमत्ता माहिती लपवल्याच्या आरोपावरून भाजपने न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी सांगितले की, पक्षाचे नेतृत्व यावर योग्य तो निर्णय घेईल. वक्फ प्रकरणावर काँग्रेस मौन बाळगून असल्याचा आणि प्रियंका गांधी यांनी मुस्लिम मतांसाठी वायनाडची निवड केली असल्याचा आरोपही त्यांनी केला.
प्रियंका गांधी यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याबाबत पक्ष निर्णय घेईल. न्यायालयात जाण्याचा पर्याय फेटाळता येत नाही. वक्फ प्रकरणासह अनेक मुद्द्यांवर काँग्रेस केरळमध्ये मौन बाळगून आहे. २०१३ च्या वक्फ कायद्याद्वारे काँग्रेसने केवळ मते मिळवण्यासाठी काम केले. भारतात दोन कायदे चालणार नाहीत, भारतीय दंड संहितेनुसारच सर्व काही चालेल, असेही भंडारी म्हणाले.
इंडिया आघाडी पूर्णपणे कोसळल्याचे प्रियंका गांधी यांच्या वायनाडमधील उमेदवारीवरून दिसून येते, असे भंडारी म्हणाले. जातीय राजकारण करणाऱ्यांमध्येच ही लढत आहे. भाजप संविधानावर विश्वास ठेवतो. प्रियंका गांधी जमात-ए-इस्लामीच्या पाठिंब्याने निवडणूक लढवत आहेत. प्रचारसभांमध्ये मुस्लिम लीगचे झेंडे जास्त दिसत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रीय ध्वज कमी प्रमाणात दिसत आहेत. प्रियंका गांधी केवळ मुस्लिमांच्या नेत्या बनत चालल्या आहेत. मते मिळवण्यासाठीच त्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत.
वायनाडमध्ये पाचशे बलात्काराच्या घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आली आहे. राहुल गांधी वायनाडचे खासदार असताना घडलेल्या या घटनांबाबत प्रियंका गांधी यांनी काहीही बोलले नाही. काँग्रेसला वायनाडमधील ३० टक्के मुस्लिम मतांपैकी ९० टक्के मते मिळवण्याचा प्रयत्न आहे. प्रियंका गांधी राष्ट्रीय नेत्या नाहीत, केरळच्याही नाहीत, त्या केवळ मुस्लिमांच्या नेत्या बनत चालल्या आहेत. हे मीच नाही तर सीपीएमही म्हणत आहे.
भाजपला यावेळी वायनाडमध्ये किती आशा आहे, या प्रश्नावर भंडारी म्हणाले की, वायनाडची जनता विकासाचे राजकारण निवडेल आणि प्रलोभनाचे राजकारण नाकारेल. भाजपला चांगली आशा आहे.