भाजपने दुसऱ्या टप्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून काही नावे जाहीर केली आहेत.
भारतीय जनता पार्टीने दुसऱ्या टर्मचे लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रात पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. काही भाजप खासदारांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये खासकरून नंदुरबारमधून हिना गावित, अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे, सांगलीतून संजयकाका पाटील यांना तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना नागपूरचे तिकीट मिळाले आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत 72 उमेदवारांची नावे आहेत. यापूर्वी भाजपने १९५ उमेदवारांची नावे असलेली पहिली यादी जाहीर केली होती.