हाय ये बिहारी : विमानतळाच्या रनवेवर बसून केली लघुशंका, बघा चक्क पायलटने टिपलेला व्हिडिओ

Published : Sep 02, 2025, 12:34 PM IST

बिहार म्हटले की जगावेगळ्या गोष्टी दिसून येतात. बिहारमध्ये काहीही होऊ शकते, असे म्हटले जाते. याची प्रचिती आता या व्हिडिओमुळे येत आहे. एका व्यक्तीने चक्क विमानतळाच्या रनवेवर लघुशंका केली. विशेष म्हणजे याचा व्हिडिओ पायलटने विमानातून टिपला.

PREV
15

बिहारमधील दरभंगा विमानतळावर घडलेली एक घटना सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. पायलटने विमानाच्या कॉकपिटमधून काढलेला व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक वृद्ध व्यक्ती रनवेच्या अगदी जवळ बसून लघुशंका करताना दिसतो. तो विमानापासून केवळ काही मीटर अंतरावर होता. सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार किती गंभीर आहे यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

25

व्हिडिओमध्ये वृद्धाने पांढरा कुर्ता-पायजमा घातलेला असून तो रनवेच्या कडेला असलेल्या झुडपाजवळ लघुशंका करताना दिसतो. सुरुवातीला व्हिडिओत विमानात चढण्यासाठी रांगेत उभे असलेले प्रवासी दिसतात. मात्र कुणाचेच त्याच्याकडे लक्ष जात नाही. थोडे झूम केल्यावर वृद्ध रनवेच्या कडेला बसलेला दिसतो. या दरम्यान कॅमेरा पुन्हा कॉकपिटमधील दृश्य दाखवतो.

35

हा व्हिडिओ आदर्श आनंद नावाच्या एका एक्स (Twitter) वापरकर्त्याने शेअर केला असून आतापर्यंत तीन लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी यावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या. कुणी म्हटले की, “सामान्य माणसाने विमान प्रवास सुरू केला आहे, हेच या घटनेचे उत्तर आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “पोटदुखी किंवा शंकेवरचा हा नैसर्गिक उपाय आहे.” आणखी एकाने म्हटले, “हे काही नवीन नाही, भारतभर असे दृश्य दिसू शकते.”

45

या घटनेवर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने अजून कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. तो वृद्ध प्रवासी कोण होता, तो कोणत्या विमानात प्रवास करत होता याची माहितीही उपलब्ध झालेली नाही. पुढील स्लाईडवर बघा हा व्हिडिओ

55
Read more Photos on

Recommended Stories