सोशल मीडियावर सध्या एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जणांनी केलेल्या कृत्यांमुळे समाज कुठे चाललाय असा प्रश्न पडतोय. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे.
बंगळुरूतील ट्रिनिटी रोडजवळ एका तरुण जोडप्याने सनरूफ असलेल्या कारमधून किसिंग आणि हगिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली. आजूबाजूला कोण आहे हेही न पाहता त्यांनी हे कृत्य केले.
24
व्हायरल होणारा व्हिडिओ
मागून येणाऱ्या कारमधील व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. काही युजर्सनी हा व्हिडिओ बेंगळुरू पोलिसांना टॅग करून कारवाईची मागणी केली आहे.
34
अलर्ट झालेले पोलिस
पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आली असून, ते कारचा नंबर प्लेटच्या आधारे जोडप्याचा शोध घेत आहेत. रस्त्यावरील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना शिक्षा होईल, असे बोलले जात आहे.
या घटनेवरून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत. चार भिंतींच्या आत करायची गोष्ट सार्वजनिक ठिकाणी करणे चुकीचे असल्याचे काहींनी म्हटले आहे. इतरांना त्रास होईल असे कृत्य करू नये असेही काहींचे मत आहे. अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी नेटकरी करत आहेत.