आज, ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी बँक संप आहे. यामुळे सरकारी आणि खासगी बँकांच्या कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या संपाचा फटका ATM सेवांनाही बसू शकतो. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी बँक संपाची हाक दिली आहे. हा आठवड्याचा शेवटचा कामकाजाचा दिवस असल्याने, ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
210
का बंद राहणार बँका?
बँका सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. शुक्रवार, ११ सप्टेंबरला संप आहे. त्यानंतर १२ सप्टेंबरला दुसरा शनिवार आणि १३ सप्टेंबरला रविवार असल्याने या नियमित सुट्ट्या आहेत.
310
संपामागील कारण
सात बँक कर्मचारी आणि अधिकारी संघटनांची मिळून बनलेल्या UFBU ने हा संप पुकारला आहे. ६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ११ सप्टेंबरच्या संपाचा निर्णय अंतिम केला.
UFBU च्या म्हणण्यानुसार, ११ सप्टेंबरच्या संपाचा परिणाम केवळ सरकारीच नाही, तर खासगी बँकांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बँकिंग सेवांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यत्यय येण्याची शक्यता वाढली आहे.
510
एटीएमच्या सुविधेवर होणार परिणाम?
संपामुळे फक्त बँक शाखांवर परिणाम होईल का, अशी चिंता ग्राहकांना आहे. UFBU चं म्हणणं आहे की बँका बंद असल्याने ATM मध्ये पैसे भरण्याच्या कामावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे गरज असल्यास आधीच पैसे काढून ठेवणं चांगलं.
610
मुख्य मागणी काय?
बँक संघटनांची एक मुख्य मागणी म्हणजे आठवड्यातून पाच दिवस बँकिंग सुरू ठेवणे. २०२४ मध्ये यावर एक करार झाला होता, पण तो अजूनही केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, त्यामुळे संघटना संतप्त आहेत.
710
अतिरिक्त काम करण्याची तयारी पण...
संघटनांचा दावा आहे की, पाच दिवसांच्या आठवड्याच्या बदल्यात त्यांनी सोमवार ते शुक्रवार दररोज ४० मिनिटं जास्त काम करण्यास सहमती दर्शवली होती. हा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवला, पण त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
810
इंटेसिव्हबद्दलही तक्रार
बँक कर्मचाऱ्यांची आणखी एक मोठी मागणी म्हणजे कामगिरी-आधारित इन्सेन्टिव्ह (performance-linked incentives) प्रणालीत बदल करणे. सध्याच्या प्रणालीमुळे अनेक कर्मचारी या लाभापासून वंचित राहू शकतात, अशी तक्रार संघटनांनी केली आहे. हे संपाचं आणखी एक प्रमुख कारण आहे.
910
सप्टेंबरमध्ये तीन दिवस संप
हा संप फक्त ११ सप्टेंबरला संपणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान पुन्हा तीन दिवसांचा बँक संप करण्याचा इशारा UFBU ने दिला आहे. यात साप्ताहिक सुट्ट्या जोडल्यास बँका आणखी जास्त काळ बंद राहू शकतात.
1010
ऑक्टोबरमध्ये बेमूदत संपावर जाण्याचा इशारा
सप्टेंबरमधील आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास, २६ ऑक्टोबरपासून बेमुदत बँक संपावर जाण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. याचा अर्थ, बँकिंग सेवांवर लवकरच मोठं संकट येऊ शकतं.