
दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला झाला. आज दिल्लीतील ग्रेटर कैलाश भागात कार्यकर्ते आणि इतर नेत्यांसह पदयात्रा करत असताना हा हल्ला झाला. पदयात्रा सुरू असताना अचानक एका व्यक्तीने केजरीवाल यांच्यावर द्रव फेकला.
इतर कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांनी लगेच हल्लेखोराला पकडले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले. बाटलीत आणलेला द्रव केजरीवाल यांच्या अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला जात होता. द्रवाचे काही थेंब केजरीवाल यांच्या अंगावर पडले, पण सुदैवाने त्यांना दुखापत झाली नाही.
हल्ल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. या घटनेत केजरीवाल आणि कार्यकर्त्यांना कोणतीही इजा झालेली नाही. कोणत्या प्रकारचा द्रव फेकण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा तपास सुरू असून आरोपीची चौकशी सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.