हवाई दलाच्या AN-32 विमानाला अपघात; पाच जवान शहीद, एकजण गंभीर जखमी

Published : Jun 13, 2026, 04:44 PM IST
indian air force

सार

जोरहाट येथे भारतीय हवाई दलाचे विमान नियमित प्रशिक्षण उड्डाणानंतर उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले. या भीषण अपघातात पाच जवान शहीद झाले असून, एका जखमी अधिकाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.

भारतीय हवाई दलाचे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आहे. या विमानाला जोरहाट येथील विमान तळावर उतरताना भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत हवाई दलाचे पाच जवान शहीद झाले आहेत. त्यामुळं संपूर्ण देशावर दुःखाचे सावट कोसळलं आहे. या अपघातात एक अधिकारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

उड्डाणाच्या दरम्यान झाली दुर्घटना

उड्डाण चालू होत त्याचवेळेस दुर्घटना झाल्याची माहिती मिळाली आहे. या विमानाचा अपघात हा रोजच्या नियमित प्रशिक्षण उड्डाण दरम्यान झाला. सकाळी दहा वाजता ते धावपट्टीवर उतरत असताना त्याला अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये जागेवरच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर विमानाला आग लागल्यामुळं बचावकार्य तातडीने सुरु करण्यात आलं.

पाच जवानांचा झाला मृत्यू

या अपघातात पाच जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत जवानांमध्ये स्क्वॉड्रन लीडर प्रशांत सिंह, फ्लाइट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीरवायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीरवायू दानिश आलम यांचा समावेश आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सहवैमानिकावर उपचार सुरु

सहवैमानिकावर यावेळी उपचार सुरु असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो वैमानिक अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर डॉक्टरांचे एक पथक लक्ष देत असून तब्येतीवर खासकरून डॉक्टरांच लक्ष देणं सुरु आहे. या अपघाताचे नेमक कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.

देशभरातून जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

देशभरातून सर्व जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. या विमानात नेमकं काय बिघाड झाला होता याचा तपास केला जाणार आहे. या जवानांच्या कुटुंबांच्या प्रति संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

IAF Plane Crash : आसामजवळील जोहराटमध्ये हवाई दलाच AN-32 विमान कोसळलं
Monsoon Update : 'अल निनो' नक्की काय आहे? मॉन्सूनवर याचा असा होतो परिणाम, वाचा यंदाच्या पावसाच्या अंदाजाबद्दल सविस्तर