Air India: एअर इंडियाने अत्यंत कमी दरात 'बेसिक फेअर' सुरू केलं आहे. यामुळे भारतातील कोणत्याही शहरात खिशाला परवडणाऱ्या दरात तिकीट मिळेल. काय आहे हे 'बेसिक फेअर'?
एअर इंडियाने सुरू केलेलं 'बेसिक फेअर' फक्त देशांतर्गत प्रवासासाठी आहे. यातून आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही. पण भारतात कुठेही जायचं असेल, तर कमी पैशात प्रवास शक्य आहे. सर्वांना विमान प्रवासाची संधी देण्याचा एअर इंडियाचा हा प्रयत्न आहे.
25
जेवण नाही, पण चहा-कॉफी मिळेल
'बेसिक फेअर' तिकिटात तुम्हाला मोफत जेवण मिळणार नाही. पण प्रवासात चहा किंवा कॉफी दिली जाईल. कमी खर्चात प्रवास घडवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे एअर इंडियाने काही सुविधा कमी करून तिकीट दर घटवले आहेत.
35
सामानाचं काय? काळजी नसावी!
या तिकिटावरही प्रवाशांना 15 किलोपर्यंतचा लगेज आणि 7 किलोची हँड बॅग सोबत नेता येईल. त्यामुळे सामानाबद्दल चिंता करण्याची गरज नाही. इकॉनॉमी क्लासप्रमाणेच ही सुविधा कायम ठेवली आहे.
'बेसिक फेअर' तिकीट बुक करताना प्रवासी फक्त त्यांना हव्या असलेल्या सुविधा निवडू शकतात. प्रवासात जेवण हवं असेल, तर तिकीट बुकिंगनंतरही ते वेगळं बुक करता येतं. यामुळे एअर इंडिया प्रवाशांना कमी खर्चात प्रवासाचा पर्याय देत आहे.
55
प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात
सध्या अनेकजण ट्रेन किंवा इतर वाहनांनी लांबचा प्रवास करतात, ज्यात वेळ आणि पैसा दोन्ही जास्त लागतो. आता एअर इंडियाच्या 'बेसिक फेअर'मुळे कमी खर्चात देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचता येईल. सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर सुरू झाली आहे. ती यशस्वी झाल्यास टप्प्याटप्प्याने तिचा विस्तार केला जाईल.
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.