Air India Express: विमान रनवेवर धावत असताना प्रवासी उभेच, सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

vivek panmand   | CMS
Published : Sep 22, 2026, 06:55 PM IST
photo

सार

एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान रनवेवर धावत असताना काही प्रवासी चक्क उभे असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर विमानातल्या सुरक्षेवर आणि प्रवाशांच्या बेशिस्तपणावर सोशल मीडियात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानातला एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. विमान रनवेवर धावत असताना काही प्रवासी चक्क उभे असल्याचं यात दिसत आहे. यामुळे विमानातली सुरक्षा, प्रवाशांची शिस्त आणि क्रू मेंबर्सच्या सूचनांचं पालन यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. हा व्हिडिओ एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX 1236 या फ्लाईटमधला आहे. अमिताव दास या प्रवाशाने तो 'X' वर शेअर केला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओची दखल घेत एअरलाइननेही स्पष्टीकरण दिलं आहे.

या क्लिपमध्ये विमान रनवेवर धावत असताना अनेक प्रवासी सीटवरून उठून उभे राहिलेले दिसतात. हा प्रकार रेकॉर्ड करताना अमिताव म्हणतात, "विमान धावतंय आणि प्रवासी उभे आहेत. ही एअर इंडिया एक्सप्रेसची अवस्था आहे. तुम्हीच पाहा."

आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये अमिताव यांनी एअरलाइनच्या सुरक्षेवर थेट सवाल उपस्थित केले आहेत. त्यांनी लिहिलंय, "विमान धावत असताना प्रवासी उभे आहेत. @AirIndiaX त्यांच्या IX 1236 फ्लाईटमध्ये नेमके कोणते सुरक्षा नियम पाळते?"

या पोस्टवर एअर इंडिया एक्सप्रेसने रिप्लाय देत, विमानात घडलेल्या या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला आहे.

"हाय अमिताव, IX 1236 फ्लाईटमध्ये घडलेल्या प्रकारामुळे तुम्हाला जो त्रास झाला, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. प्रवाशांची सुरक्षा हीच आमची प्राथमिकता आहे. आमचं सर्व कामकाज हे ठरवून दिलेल्या सुरक्षा नियमांनुसारच चालतं, याची आम्ही तुम्हाला खात्री देतो," असं एअरलाइनने म्हटलं आहे.

विमान प्रवासादरम्यान सुरक्षेचे सर्व नियम पाळले जावेत आणि कोणत्याही परिस्थितीला योग्य प्रकारे सामोरं जाता यावं, यासाठी आमच्या केबिन क्रूला विशेष ट्रेनिंग दिलेलं असतं, असंही कंपनीने स्पष्ट केलं.

"तुम्ही वेळ काढून ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत."

या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर विमान प्रवासातील शिस्त आणि प्रवाशांच्या वागणुकीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे. विमान उड्डाणाच्या महत्त्वाच्या टप्प्यांवर प्रवाशांनी आपल्या सीटवरच बसून राहावं आणि केबिन क्रूच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं, असं मत अनेक युजर्सनी व्यक्त केलं आहे.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bhopal Police: 'जय जोहार'च्या नाऱ्यावर भडकला भोपाळचा पोलीस, आदिवासी विद्यार्थ्यांना दिली शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल होताच निलंबन
Viral Video: राजस्थानमध्ये मोहरीच्या तेलाचा टँकर उलटला, तेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड