Air India Plane Crash: फक्त दोन दिवसांपूर्वी डॉ. कोमी यांनी दिला होता राजीनामा, लंडनमध्ये स्थायिक होण्याचं होतं स्वप्न; पती आणि तीन मुलांसह संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू

Published : Jun 12, 2025, 10:44 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 11:06 PM IST
rajasthan

सार

अहमदाबाद-लंडन विमान दुर्घटनेत बांसवाड्यातील प्रतीक जोशी यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला. राजस्थानमधील 10 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे.

अहमदाबादहून लंडनला जाणारी एअर इंडियाची AI-171 ही फ्लाइट गुरुवारी दुपारी भीषण अपघाताचा शिकार झाली. टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान कोसळलं आणि या दुर्घटनेने संपूर्ण देश हादरून गेला. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात आतापर्यंत 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक लोक जखमी आहेत.

या अपघाताशी संबंधित आणखी एक वेदनादायक घटना राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यातून समोर आली आहे. बांसवाड्याचे रहिवासी प्रतीक जोशी हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या विमानात होते. प्रतीक जोशी हे गेल्या सहा वर्षांपासून लंडनमध्ये वास्तव्यास होते आणि आता पत्नी व तीन मुलांसह ते कायमस्वरूपी तिथे स्थायिक होण्यासाठी निघाले होते.

नव्या आयुष्याच्या दिशेने निघालेला प्रवास, पण...

प्रतीक जोशी यांच्या पत्नीचं नाव डॉ. कोमी व्यास असून त्या पेशाने डॉक्टर होत्या. त्यांनी नुकतंच म्हणजे फक्त दोन दिवसांपूर्वी आपली नोकरी राजीनामा देऊन सोडली होती, जेणेकरून लंडनमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करता येईल. त्यांच्या कुटुंबात तीन लहान मुले होती, त्यापैकी दोन जुळ्या मुली असून त्यांचे वय अवघे पाच वर्षे होते.

प्रतीक जोशी यांची ही योजना अनेक दिवसांपासून सुरू होती. पत्नी आणि मुलांना लंडनमध्ये स्थायिक करून एकत्र नव्या आयुष्याची सुरुवात करायची होती. मात्र नियतीने त्यांचे हे स्वप्न अपूर्णच ठेवले. विमान अपघाताने काही क्षणातच संपूर्ण कुटुंबाचा अंत केला.

बांसवाडामध्ये शोककळा

ही बातमी समोर येताच बांसवाडा शहरात आणि त्यांच्या ओळखीच्या सर्व लोकांमध्ये शोककळा पसरली आहे. प्रतीक आणि डॉ. कोमी हे दोघंही शिकलेले, मेहनती आणि सज्जन दांपत्य होते. त्यांच्याविषयी ऐकून अनेकजण स्तब्ध झाले आहेत.

राजस्थानातील 10 जणांचा मृत्यू निश्चित

या भीषण दुर्घटनेत राजस्थानमधील 10 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. बांसवाड्याहून प्रतीक जोशी यांच्यासह पाच जण, उदयपूरहून चार, तर बालोतरा येथील खुशबू राजपुरोहित यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला आहे. उदयपूरच्या पिंकू मोदी यांचा मुलगा शुभ (वय 24) आणि मुलगी शगुन मोदी (वय 22), तसेच रुंडेडा गावातील वर्दी चंद मेनारिया आणि प्रकाश मेनारिया हेही अपघातात मरण पावले आहेत.

 

PREV
RG
About the Author

Rameshwar Gavhane

रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.Read More...
Read more Articles on

Recommended Stories

Goa Club Fire : गोव्यातील आग लागलेल्या क्लबचे दोन्ही मालक देश सोडून फरार, पोलिसांकडून मोठी कारवाई सुरू
8व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारची नवीन अपडेट, कर्मचाऱ्यांमध्ये वाढली उत्सुकता