Ahmedabad Plane Crash ब्रिटिश प्रवाशाचा व्हिडिओ ठरला अखेरचा, ''गुड बाय टू इंडिया'' म्हणत ''लाईफलाच गुड बाय केला''

Published : Jun 12, 2025, 09:45 PM IST
Ahmedabad Plane Crash ब्रिटिश प्रवाशाचा व्हिडिओ ठरला अखेरचा, ''गुड बाय टू इंडिया'' म्हणत ''लाईफलाच गुड बाय केला''

सार

अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेच्या काही क्षणांपूर्वी ब्रिटिश प्रवाशाने काढलेला अखेरचा व्हिडिओ सापडला आहे. गुड बाय टू इंडिया असे म्हणणारा हा व्हिडिओ अनेकांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. 

अहमदाबाद - अहमदाबाद एअर इंडिया विमानातील गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानींसह सर्व प्रवासी ठार झाल्याचे वृत्त आहे. या विमानात ५३ ब्रिटिश नागरिक, ७ पोर्तुगीज, एक कॅनडाचा नागरिक आणि १६९ भारतीय प्रवास करत होते. यातील दोन ब्रिटिश नागरिकांनी बनवलेला व्हिडिओ सापडला आहे. शेवटी व्हिडिओ काढून पोस्ट केला आहे. गुड बाय टू इंडिया म्हणत विमानात चढलेल्या ब्रिटिश नागरिकांना हा शेवटचा प्रवास असल्याची कल्पनाही नव्हती.

अखेरचा व्हिडिओ

ब्रिटिश नागरिक जॅमी रे मीक आणि त्याचा मित्र हे दोघे भारतात फिरायला आले होते. येथील अनेक पर्यटन स्थळांना भेट दिली होती. गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठेत फिरले होते. शेवटी अहमदाबादहून लंडनला परतण्यासाठी एअर इंडियाच्या विमानात चढले. बोर्डिंगपूर्वी लाउंजमध्ये बसलेले जॅमी रे मीक आणि त्याचा मित्र व्हिडिओ बनवत होते. पण हाच व्हिडिओ अखेरचा व्हिडिओ ठरला.

गुड बाय टू इंडिया

आम्ही आता विमानतळावर आहोत. आता विमान बोर्डिंग व्हायचे आहे. गुड बाय टू इंडिया, १० तासांचा लंडनचा प्रवास आहे. मित्रासोबतच्या गप्पा मारताना मीक यांनी व्हिडिओत, भारतातील प्रवासातील सर्वात मोठा टेक अवे म्हणजे मी संयम गमावला नाही असे म्हटले आहे. लंडनला खूप आनंदाने, खूप खूश होऊन परतत आहे असे व्हिडिओत म्हटले आहे.

 

 

हा व्हिडिओ बनवल्यानंतर विमानात चढलेले मीक आणि त्याचा मित्र प्रवासाला निघाले. अहमदाबाद विमानतळावरून टेक ऑफ झाल्यानंतर ५ मिनिटांत विमान कोसळले. गुड बाय टू इंडिया असा व्हिडिओ बनवलेल्या दोघा ब्रिटिश नागरिकांना या जगाला निरोप दिला आहे. हसतमुख आणि आनंदाने घरी परतण्याच्या उत्साहात असलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. आता त्यांचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

२४१ जण ठार

अहमदाबाद विमानतळावरून निघालेले विमान काही अंतरावर असलेल्या मेघानीनगर येथील मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळले. या विमानातील एक व्यक्ती वगळता इतर सर्व प्रवासी ठार झाले आहेत, असे अहमदाबादचे पोलीस आयुक्त यांनी स्पष्ट केले आहे. विमानात दोन पायलट, केबिन क्रू आणि २४२ प्रवासी प्रवास करत होते.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Vivekanand Patil Speech 10 Oct 2026 | विवेकानंद पाटील संपूर्ण भाषण | Navnath ban | MPSC Pune Protest
MPSC Pune Protest | राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यानेच मांडली व्यथा | State health Department