Ahmedabad Plane Crash : मोदींनी जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, सुब्रमण्यम स्वामींची मागणी

Published : Jun 12, 2025, 09:31 PM IST
Ahmedabad Plane Crash : मोदींनी जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, सुब्रमण्यम स्वामींची मागणी

सार

अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची नैतिक जबाबदारी घेत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. अमित शहा आणि राम मोहन नायडू यांनीही राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले आहेत.

मुंबई - अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची नैतिक जबाबदारी घेत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटर (एक्स)वरून केली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

पंतप्रधान मोदींसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनीही नैतिक जबाबदारी घेत राजीनामा द्यावा, असे स्वामी म्हणाले आहेत. १९५० मध्ये रेल्वे अपघात झाला तेव्हा तत्कालीन केंद्रीय मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, अशी आठवण त्यांनी करून दिली. त्याच धर्तीवर आज अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताप्रकरणी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि राम मोहन नायडू यांनी राजीनामा द्यावा, असे ते म्हणाले आहेत.

गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एआय १७१ बोईंग ७८७ ड्रीमलाइनर या एअर इंडियाच्या विमानाचा गुरुवारी दुपारी अपघात झाला. विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच इंजिन निकामी झाल्याने मेघानी नगरच्या घोडासर कॅम्प परिसरात विमान कोसळले. जे. बी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतींवर विमान आदळल्याने तेथे राहणाऱ्या २० हून अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

एअर इंडियाच्या विमानात २४२ प्रवासी होते:

अपघाताच्या वेळी विमानात १२ कर्मचाऱ्यांसह २४२ प्रवासी होते. १२ जून रोजी दुपारी १.३९ वाजता एअर इंडियाचे विमान कोसळल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एअर इंडियाचे विमान सुमारे ६२० फूट उंचीवर असताना सिग्नल गमावले. अपघातग्रस्त बोईंग ७८७ ड्रीमलाइनर गेल्या ११ वर्षांपासून सेवेत होते. ते ३०० प्रवाशांना घेऊन जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अपघात झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांना फोन करून वेगवेगळ्या प्रकारे चर्चा केली. त्यांनी घटनेचा प्रकार आणि कारणांची चौकशी केली. पंतप्रधान मोदींनी दोघांनाही अहमदाबादला जाऊन वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Lionel Messi India Visit : 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी भारतात दाखल, ‘GOAT इंडिया टूर 2025’ला भव्य सुरुवात
मेस्सी-मेस्सीच्या घोषणांनी दुमदुमले कोलकाता, रात्री उशिरा पोहोचला GOAT