Ahmedabad Plane Crash मध्ये चमत्कार! "सर्व मृत" घोषणेनंतर जिवंत सापडला प्रवासी, अहमदाबादच्या आयुक्तांनी दिला दुजोरा

Published : Jun 12, 2025, 07:47 PM ISTUpdated : Jun 12, 2025, 08:14 PM IST
ramesh vishwakumar

सार

२४२ प्रवाशांसह कोसळलेले AI-171 विमान, लंडनकडे जात होते आणि टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच मेघनगर परिसरात कोसळले. अपघातानंतर काही तासांतच अहमदाबाद पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केले की, एका प्रवाशाचा जीव वाचलेला आहे.

अहमदाबाद - गुरुवारी दुपारी अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या भयानक विमान अपघातानंतर, जिथे कोणत्याही प्रवाशाचा जीव वाचला नसल्याचे प्राथमिक निवेदन होते, तिथे आता एक आश्चर्यकारक चमत्कार घडला आहे.

२४२ प्रवाशांसह कोसळलेले AI-171 विमान, लंडनकडे जात होते आणि टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच मेघनगर परिसरात कोसळले. अपघातानंतर काही तासांतच अहमदाबाद पोलिसांनी अधिकृतपणे जाहीर केले की, एका प्रवाशाचा जीव वाचलेला आहे. त्याचे नाव रमेश विश्वकुमार आहे.

अहमदाबादचे पोलिस आयुक्त काय म्हणाले

11A सीटवरील प्रवासी जिवंत! अहमदाबादचे पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "11A सीटवर बसलेला एक प्रवासी वाचला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत."

मलिक यांनी पुढे सांगितले की, "विमान निवासी भागात कोसळल्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या बचाव आणि शोधकार्य सुरू असून, अचूक मृतांची संख्या सांगणे कठीण आहे."

बचावलेला प्रवासी 

विश्वश कुमार रमेश विश्वश कुमार रमेश, वय ४०, हे अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी आहेत. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी घटनेच्या क्षणाचे भयावह तपशील सांगितले.

त्यांनी सांगितले की, "विमानानं टेकऑफ घेतल्यानंतर अवघ्या ३० सेकंदातच जोरजोरात आवाज येऊ लागले आणि मग काही कळायच्या आत विमान कोसळलं. सगळं इतकं वेगानं घडलं की आम्हाला सावरायलाही वेळ मिळाला नाही."

शारीरिक दुखापत, पण मानसिक ताकद रमेश यांच्या छातीला, डोळ्यांना आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत, मात्र ते शुद्धीवर आहेत आणि उपचारांना प्रतिसाद देत आहेत.

या अपघातानंतरचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते लंगडत चालताना दिसतात. त्यांच्या कपड्यांवर रक्ताचे डाग व धुराचे डाग स्पष्टपणे दिसत आहेत.

जिवंत साक्षीदार ठरणार महत्त्वाचा 

विश्वश कुमार रमेश हे या अपघाताचे एकमेव जिवंत साक्षीदार असून, त्यांच्या निवेदनातून विमान कोसळण्यापूर्वी व नंतर घडलेल्या घटनांची सुस्पष्ट माहिती मिळू शकते.

त्यांचा अनुभव आणि निरीक्षण प्रशासनास अपघाताच्या नेमक्या कारणांची उकल करण्यात मदत करणार आहे, असे विमानचालन तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मेडे कॉलनंतर झाला अपघात

AI-171 हे एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान, अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून टेकऑफ झाल्यानंतर ८२५ फूट उंचीवर पोहोचले होते, तेव्हाच त्याने अचानक वेगाने खाली येण्यास सुरुवात केली.

विमानतळ नियंत्रण कक्षात एक ‘मेडे कॉल’ (आपत्कालीन संदेश) नोंदवण्यात आला होता. त्यानंतर काही सेकंदांतच संपूर्ण संपर्क तुटला आणि आकाशात मोठा स्फोट होऊन आगीचा लोळ उठल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

 

प्रशासन आणि नागरिकांमध्ये आशेचा किरण

हा एकमेव जिवंत सापडलेला प्रवासी अद्याप ओळख न झालेल्या नावाने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्या स्थितीबद्दल तपशील जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र या अपघातात एका तरी प्रवाशाचा जीव वाचल्याने दुख:द घटनेच्या पार्श्वभूमीवर आशेचा एक किरण दिसतो आहे.

NDRF, पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणांनी बचावकार्य अधिक गतीने सुरू केले असून, अजून कुणी जिवंत सापडतो का, याचा तपास सुरू आहे.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Parliament Winter Session : वंदे मातरमवर आज संसदेत चर्चा; PM मोदी दुपारी १२ वाजता सुरुवात करणार, नक्की काय आहे वाद घ्या जाणून
IndiGo Flights Cancel Day 6 : आज 650 उड्डाणे रद्द, वाचा कोणत्या शहरातून किती उड्डाणे झाली रद्द