Rice Storage: पावसाळ्यात तांदळाला कीड लागतेय? एकही पैसा खर्च न करता कीड घालवण्यासाठी ५ घरगुती उपाय

vivek panmand   | CMS
Published : Sep 04, 2026, 06:04 PM IST
Rice Storage: पावसाळ्यात तांदळाला कीड लागतेय? एकही पैसा खर्च न करता कीड घालवण्यासाठी ५ घरगुती उपाय

सार

पावसाळ्यात तांदळाच्या डब्यात लहान किडे होणं ही एक सामान्य समस्या आहे. केमिकल न वापरता घरगुती उपायांनी तांदळातील कीड कशी घालवायची आणि तांदूळ चांगला कसा ठेवायचा, यासाठी या आहेत ५ सोप्या टिप्स.

Rice: पावसाळा आला की स्वयंपाकघरातली सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे तांदळाच्या डब्याला कीड लागणं. थोडा जरी दमटपणा आला की तांदळात लहान काळे किडे, ज्याला आपण तांदळातील सोंडे (Weevil) म्हणतो, ते तयार होतात. असे किडलेले तांदूळ खाायलाही चांगले लागत नाहीत आणि ते आरोग्यासाठीही धोकादायक असतात. बाजारातून महागडे डबे आणूनही काही फायदा होत नाही. पण चिंता करू नका, स्वयंपाकघरातील काही गोष्टी वापरून तुम्ही ही कीड सहज घालवू शकता.

जादवपूर विद्यापीठाच्या फूड टेक्नॉलॉजी आणि बायो-केमिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्राध्यापक प्रशांत बिस्वास सांगतात, 'धान्यातील कीड घालवण्यासाठी क्लोरीन फंगिसाइड वापरलं जातं. पण अडचण ही आहे की, तांदूळ धुतल्यानंतरही हे केमिकल पूर्णपणे निघून जात नाही. असं अन्न खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे अशावेळी आपल्या आई-आजींचे घरगुती उपायच जास्त फायदेशीर ठरतात.'

*१. कडुलिंबाची पानं आणि सुक्या मिरच्या*

तांदळातील कीड घालवण्याचा सर्वात जुना आणि प्रभावी उपाय म्हणजे कडुलिंब. तांदळाच्या डब्यात १५-२० सुकलेली कडुलिंबाची पानं आणि ४-५ सुक्या लाल मिरच्या ठेवा. कडुलिंबाचा कडवट वास आणि मिरचीचा तिखटपणा यामुळे किडे जवळ फिरकत नाहीत. यामुळे तांदळाचा वासही जात नाही, उलट तांदूळ चांगला राहतो. आठवड्यातून एकदा ही पानं बदला.

*२. लसूण आणि काळी मिरी*

तांदळाच्या डब्यात सालासकट लसणाच्या ८-१० पाकळ्या आणि एक चमचा अख्खी काळी मिरी एका पातळ कापडात बांधून त्याची पुरचुंडी ठेवा. लसणाच्या उग्र वासामुळे किडे तांदळाच्या जवळही येणार नाहीत. या पद्धतीमुळे तांदळाच्या चवीत कोणताही बदल होत नाही. लसूण सुकल्यावर पुन्हा नवीन लसूण ठेवा.

*३. उन्हात ठेवणे आणि कापूर*

पावसाळ्यात दमटपणामुळेच तांदळाला कीड लागते. म्हणून महिन्यातून एकदा तरी तांदूळ उन्हात ठेवा. एका मोठ्या परातीत तांदूळ पसरवून २-३ तास कडक उन्हात ठेवल्यास किडे आपोआप निघून जातात. तांदूळ थंड झाल्यावर डब्यात भरताना कापराच्या २-३ वड्या एका कागदात गुंडाळून डब्यात ठेवा, कीड पुन्हा येणार नाही.

*४. लवंग*

लवंगेचा वास किड्यांना अजिबात सहन होत नाही. तांदळाच्या डब्यात १०-১২ लवंगा पसरवून ठेवा. लवंग फक्त कीडच घालवत नाही, तर तांदळात एक छान सुगंधही टिकवून ठेवते. हा उपाय सर्वात सोपा आहे आणि यामुळे तांदळाची चवही चांगली राहते. १ किलो तांदळासाठी ५-६ लवंगा पुरेशा आहेत.

*५. डबा स्वच्छ ठेवणे आणि साठवणूक*

फक्त किडे घालवून उपयोग नाही, तर डबा व्यवस्थित ठेवणंही महत्त्वाचं आहे. तांदूळ ठेवण्याआधी डबा स्वच्छ धुऊन पूर्णपणे सुकवून घ्या. ओल्या डब्यात तांदूळ ठेवल्यास कीड लागतेच. नेहमी हवाबंद (Airtight) डबा वापरा. शक्य असल्यास तांदळाचा डबा जमिनीवर न ठेवता थोड्या उंच जागेवर ठेवा, जेणेकरून त्याला खालून थंडावा लागणार नाही.

PREV
India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Bengaluru Bike Stunt: बंगळुरूच्या जयनगरमध्ये तरुणाचा धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल
Kotagiri Truck Accident: तमिळनाडूच्या कोठागिरीत लाकडांनी भरलेला ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला