Published : May 01, 2025, 10:49 AM ISTUpdated : May 01, 2025, 11:05 PM IST

1st May 2025 Live Updates: 'मिशन महापालिका': एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जबर धक्का! मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोठा राजकीय उलथापालथ

सार

1st May 2025 Live Updates : एशियानेट न्यूज मराठीवर आजच्या ताज्या घडामोडी, ठळक बातम्यांचा आढवा घ्या

uddhav thackeray eknath shinde

11:05 PM (IST) May 01

'मिशन महापालिका': एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना जबर धक्का! मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मोठा राजकीय उलथापालथ

एकनाथ शिंदे यांनी 'मिशन महापालिका' सुरू करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला जोरदार हादरा दिला आहे. कोकणापासून ते मुंबईपर्यंत अनेक माजी नगरसेवक आणि शाखा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read Full Story

10:45 PM (IST) May 01

मनोज जरांगे पाटील यांना भोवळ, बीड दौरा रद्द; संभाजीनगरात तातडीने रुग्णालयात दाखल!

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उष्माघात आणि अतिसाराचा त्रास झाल्याने त्यांचा बीडचा दौरा रद्द करण्यात आला.

Read Full Story

09:56 PM (IST) May 01

भास्करराव जाधवांच्या डोळ्यात अश्रू, नेमकं काय घडलं?

कोकणातील शिवसेना आमदार भास्करराव जाधव यांनी आपल्या घरातील काम करणाऱ्या सुप्रिया पाटील हिच्या लग्नात भावनिक क्षण अनुभवले. 8 वर्षांपासून त्यांच्या घरी काम करणाऱ्या सुप्रियाला त्यांनी आपली मुलगी मानले असून तिच्या पाठवणीच्या वेळी जाधव कुटुंब भावूक झाले.
Read Full Story

09:51 PM (IST) May 01

पाकिस्तानी रेडिओवर भारतीय गाण्यांवर बंदी, कोणत्याही प्रकारचा भारतीय कंटेन्ट बॅन

पाकिस्तानने एफएम रेडिओ स्टेशन्सवर भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे. इस्लामाबादने पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स असोसिएशनच्या या 'देशभक्तीपर' पाऊलाचे स्वागत केले आहे.

Read Full Story

09:06 PM (IST) May 01

शाह पुन्हा म्हणाले- चून चून कर बदला लेंगे, ओवेसे म्हणाले- अब की बार घरमें घुस कर मारेंगे

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी कठोर भूमिका घेतली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनीही अब की बार घर में घुसकर मारेंगे असे म्हटले आहे.

Read Full Story

08:24 PM (IST) May 01

शरबत जिहादवर बाबा रामदेव यांना कोर्टाने खडसावले, ''२४ तासांत व्हिडिओ हटवा''

दिल्ली उच्च न्यायालयाने योगगुरु रामदेव यांना रूह अफझाविरुद्धचा आक्षेपार्ह व्हिडिओ २४ तासांत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. हमदर्दच्या याचिकेवरून न्यायालयाने अवमाननेचा इशारा दिला आहे.

Read Full Story

07:08 PM (IST) May 01

१०+ सोप्या किचन TIPS : मायक्रोवेव्हचा असा करा वापर

मायक्रोवेव्ह (Microwave) फक्त अन्न गरम करण्यापुरता मर्यादित नाही. याचा संपूर्ण फायदा घेण्याचे अनेक मार्ग आहेत. मास्टरशेफ पंकज भदौरिया काही किचन हॅक्स शेअर केले आहेत.

Read Full Story

06:52 PM (IST) May 01

छाया कदम अडचणीत, वन्यप्राण्यांचे मांस खाल्ल्याच्या वक्तव्याची होणार चौकशी

‘लापता लेडीज’, ‘सैराट’ आणि ‘ऑल वुई इमॅजिन ॲज अ लाइट’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांतून अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री छाया कदम चांगल्याच वादात अडकल्या आहेत.

Read Full Story

06:33 PM (IST) May 01

चून चून के... पहलगाम हल्ल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा इशारा

अमित शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर ठाम प्रत्युत्तर देण्याचा प्रण केला आहे, तसेच भारताचा दहशतवादविरोधी लढ्याचा निर्धार अधोरेखित केला आहे. 

 

Read Full Story

05:44 PM (IST) May 01

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी, सुमारे ५ किलोमीटरपर्यंत लागल्या रांगा

देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला जोडणार्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर येत आहे.

Read Full Story

05:26 PM (IST) May 01

मीडिया, मनोरंजन उद्योग १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल : मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज गुरुवारी (१ मार्च) सांगितले की, भारताचा मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकतो.

Read Full Story

03:16 PM (IST) May 01

रोबोटिक्स CEO हर्षवर्धन यांनी पत्नी, मुलाला गोळ्या घालून केली आत्महत्या

रोबोटिक्स CEO आत्महत्या : अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यात भारतीय वंशाचे टेक उद्योजक हर्षवर्धन एस. किक्केरी (Harshavardhana S Kikkeri) यांनी पत्नी श्वेता पनियम (Shwetha Panyam) आणि १४ वर्षीय मुलाला गोळ्या घालून ठार मारले आणि नंतर स्वतः आत्महत्या केली.

 

Read Full Story

02:45 PM (IST) May 01

Waves Award मध्ये PM मोदींची मोठी घोषणा, ५ चित्रपट निर्मात्यांच्या नावे काढले पोस्टाचे तिकीट

WAVES समिट २०२५: मुंबईत WAVES समिट २०२५ सुरू झाली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत केले.

Read Full Story

12:41 PM (IST) May 01

अजमेरमधील हॉटेलला भीषण आग, 4 जणांचा होरपळून मृत्यू

अजमेरच्या नाज हॉटेलमध्ये भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एक लहान मूलही आहे. एका आईने आपल्या मुलाला खिडकीतून फेकून त्याचा जीव वाचवला.

Read Full Story

12:09 PM (IST) May 01

रेड २: अजय देवगन, रितेश देखमुखची धमाकेदार कामगिरी

रेड २ चित्रपटाचा आढावा: अजय देवगनचा रेड २ चित्रपट गुरुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. बऱ्याच दिवसांनी एक वेगळी आणि आवडती कथा असलेला चित्रपट आला आहे.

Read Full Story

11:17 AM (IST) May 01

महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीचा अहवाल जाहीर, भाजप-राष्ट्रवादी आघाडीवर, शिवसेना पिछाडीवर

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाने सर्व 48 विभागांना 100 दिवसांचा कामकाजाचा टास्क दिला होता. त्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची उत्कृष्ट भूमिका बजावली आहे.

Read Full Story

11:01 AM (IST) May 01

मनसेचे अभिजित पानसे 'घाशीराम कोतवाल' नाटक हिंदीत सादर करणार

विजय तेंडुलकर यांचे राजकीयदृष्ट्या प्रवृत्त मराठी नाटक 'घाशीराम कोतवाल' हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे सदस्य अभिजित पानसे हे व्यावसायिक रंगमंचासाठी हिंदीमध्ये रूपांतरित करत आहेत.

Read Full Story

10:53 AM (IST) May 01

जातीच्या आधारावरील जगनगणनेवरुन काँग्रेसने झळकवले पोस्टर

जातीच्या आधारावरील जगनगणनेवरुन काँग्रेसने पोस्टर झळकवले आहेत.