Changes from June 1 एलपीजी ते क्रेडिट कार्डच्या नियमांत 1 जूनपासून होणार बदल

Published : May 30, 2025, 12:18 PM ISTUpdated : May 30, 2025, 03:24 PM IST
Rule Change From 1st June 2024

सार

येत्या 1 जूनपासून काही नियमांत बदल होणार आहेत. यानुसार एलपीजी सिलिंडर ते क्रेडिट कार्डचे काही नियम बदलणार आहेत. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.

मुंबई : जून महिना सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक असताना, देशातील नागरिकांसाठी काही महत्त्वाचे आर्थिक आणि सेवा संबंधित बदल लागू होणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला सरकार आणि विविध कंपन्यांकडून नवीन नियम लागू केले जातात आणि त्याचा थेट परिणाम सामान्य जनतेच्या खिशावर आणि दैनंदिन व्यवहारांवर होतो. 

सिलिंडरच्या दरात कपात

1 जून 2025 पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ऑईल मार्केटिंग कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी दर जाहीर करतात. मे महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नव्हता, परंतु व्यावसायिक सिलिंडरमध्ये 17 रुपयांची कपात करण्यात आली होती. 

हवाई प्रवासावर होणार परिणाम?

याचसोबत एअर टर्बाईन फ्युएल (ATF) चे दर देखील 1 जूनला अद्ययावत केले जातात, जे हवाई प्रवासाच्या खर्चावर थेट परिणाम करतात. यासोबतच सीएनजी आणि पीएनजीच्या दरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे वाहनचालक आणि घरगुती वापरकर्त्यांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे.

क्रेडिट कार्ड वापरकर्ते

क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांसाठी विशेषतः कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डधारकांसाठी एक महत्त्वाचा बदल आहे. जर ऑटो डेबिट ट्रांझॅक्शन अयशस्वी झाले, तर बँक 2% बाऊंस चार्ज आकारणार असून त्याची किमान मर्यादा 450 रुपये आणि कमाल मर्यादा 5000 रुपये इतकी असेल. तसेच, बँकेकडून क्रेडिट कार्डवरील मंथली फायनान्स चार्ज वाढवण्याचा प्रस्ताव आहे — तो सध्या 3.50% आहे, आणि तो वाढवून 3.75% केला जाऊ शकतो.

ईपीएफओ धारकांसाठी महत्त्वाचे

केंद्र सरकारकडून EPFO (Employees’ Provident Fund Organisation) च्या EPFO 3.0 या नव्या वर्जनचे लाँच होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय श्रम मंत्री मनसुख मांडवीया यांनी सोशल मीडियावरून यासंदर्भात माहिती दिली होती. EPFO 3.0 लागू झाल्यास देशातील 7 कोटीहून अधिक खातेदारांना थेट एटीएममधून पीएफची रक्कम काढण्याची सुविधा मिळू शकते, जे एक मोठं पाऊल ठरेल.

आधारकार्डबाबत अपडेट

शेवटी, आधार कार्ड संदर्भात देखील महत्त्वाची अपडेट आहे. यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत 14 जून 2025 आहे. त्यानंतर, आधारमधील कोणताही बदल करण्यासाठी नागरिकांना 50 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे जर कोणी आपला पत्ता किंवा इतर तपशील अद्ययावत करायचे ठरवले असेल, तर 14 जूनपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे फायदेशीर ठरेल.

PREV
Read more Articles on

Recommended Stories

Goa Club Fire Update : गोव्यातील अग्निकांडबाबत मोठी अपडेट, क्लब मालक लुथ्रा बंधूंना थायलंडमध्ये अटक
IndGo प्रवाशांसाठी 'गुड न्यूज', तक्रार करताच ॲक्शन; मंत्रालयाची 'कंट्रोल रूम' ॲक्टिव्ह!