गुरुवार, 17 ऑक्टोबर 2024 च्या मोठ्या बातम्या वाचा, फक्त एका क्लिकवर..
एशियानेट न्यूज पोर्टलवर 17 ऑक्टोबर प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…
Chanda Mandavkar | Published : Oct 18, 2024 2:55 AM IST / Updated: Oct 18 2024, 08:35 AM IST
सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची खंडणी हवीय असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर आल्याने खळबळ उडाली आहे. मेसेजमध्ये ही बाब हलक्यात घेऊ नये. सलमान खानला जीवंत रहायचे असल्यास आणि लॉरेन्स बिश्नोईसोबतचे दुश्मनी संपवायची असल्यास पाच कोटी रुपये द्यावेत. अन्यथा बाबा सिद्दिकींपेक्षा अतिशय वाईट स्थिती सलमान खानची होईल असेही मेसेजमध्ये म्हटले आहे. सध्या या संदर्भात मुंबई पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे.
कोलकातामधील आरजी कर रुग्णालयातील डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात अद्याप ज्युनिअर डॉक्टरांचे आंदोलन सुरु आहे.