'अल्फा'च्या शेड्यूलपूर्वी शर्वरीचा फिटनेसचा जलवा

Published : Oct 08, 2024, 01:43 PM ISTUpdated : Oct 08, 2024, 01:44 PM IST
Sharvari-Wagh-viral-fitness-post

सार

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरीने तिच्या आगामी 'अल्फा' चित्रपटासाठी तिच्या फिटनेसने सर्वांना प्रभावित केले आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शर्वरी तिची टोन्ड फिजिक फ्लाँट करताना दिसत आहे.

बॉलीवूडमधील नवी हिट आणि हॅपनिंग गर्ल शर्वरी, या वर्षी मुंजा ,महाराज आणि वेदा या चित्रपटांमधील प्रभावी अभिनयामुळे चाहत्यांची मनं जिंकत आहे. आता, शर्वरी तिच्या आगामी अल्फा चित्रपटाच्या आणखी एका शेड्यूलसाठी सज्ज होत असताना, तिने सोशल मीडियावर तिचे वॉशबोर्ड एब्स फ्लॉन्ट करून सर्वांना फिटनेस मोटिवेशन दिले आहे.

शर्वरीने तिच्या हॉट आणि ग्लॅमरस फिटनेस फोटोंना कॅप्शन दिलं, "इन माय फिट पूकी एरा." यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील अल्फा च्या तिसऱ्या शेड्यूलची सुरुवात होत आहे, आणि शर्वरी सध्या तिच्या फिटनेसच्या शिखरावर आहे. या चित्रपटात ती आलिया भट्टसोबत दिसणार असून हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

 

PREV

Recommended Stories

Dhurandhar 2 : अक्षय खन्ना पुन्हा साकारणार रहमान डकैत, जाणून घ्या नेमके काय घडले
Bigg Boss Marathi 6 : 'पॉवर की'चा गेम अन् तन्वीचा आगाऊपणा! पहिल्याच आठवड्यात 'हे' ९ स्पर्धक आले डेंजर झोनमध्ये