Ramayana Movie : 'रामायण'मध्ये सनी देओलचा 'हनुमान' लूक का लपवलाय? जाणून घ्या कारण

Published : Oct 17, 2026, 06:00 PM IST
Ramayana Movie : 'रामायण'मध्ये सनी देओलचा 'हनुमान' लूक का लपवलाय? जाणून घ्या कारण

सार

नितेश तिवारींच्या 'रामायण' चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारत आहे. पण दोन्ही ट्रेलरमध्ये त्याचा लूक का दाखवला नाही? पहिल्या भागात हनुमानाच्या भूमिकेचं महत्त्व काय असेल, यामागचं खरं कारण जाणून घ्या.

मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या बहुचर्चित चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर, यश आणि साई पल्लवी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट यंदाच्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आतापर्यंत रिलीज झालेल्या प्रोमो आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. पण, मेकर्सनी राम, सीता आणि रावणासह अनेक महत्त्वाच्या पात्रांची ओळख करून दिली असली, तरी हनुमानाची भूमिका मात्र अजूनही गुलदस्त्यातच ठेवली आहे. या आयकॉनिक भूमिकेला असं लपवून ठेवण्यामागचं नेमकं कारण काय?

'रामायण'मध्ये हनुमानाचा लूक अजूनही सीक्रेट!

प्रेक्षक ज्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यात 'रामायण'चं नाव सर्वात वर आहे. दोन भागांत बनत असलेल्या या बिग बजेट पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीरामाच्या, साई पल्लवी सीतेच्या, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. यांच्यासोबतच सनी देओल आणि रकुल प्रीत सिंगसारखी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

चित्रपटातील अनेक महत्त्वाच्या पात्रांचे लूक मेकर्सनी आधीच रिलीज केले आहेत. राम, सीता, रावणापासून ते कैकेयी आणि जटायूपर्यंत अनेक पात्रं प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पण, रामाचा परमभक्त असलेल्या हनुमानाच्या पात्राचा साधा सुगावा सुद्धा लागू दिलेला नाही. रिलीज झालेल्या दोन्ही ट्रेलरमध्ये हनुमानाची एकही झलक दिसलेली नाही. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

सनी देओलची हनुमान म्हणून एन्ट्री कधी होणार?

'रामायण'मध्ये सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार, ही बातमी आधीच व्हायरल झाली आहे. रामाचा परमभक्त असलेला हनुमान सीतेचा शोध घेण्यापासून ते लंकेत जाऊन तिला भेटण्यापर्यंत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. पुढे रावणाविरुद्धच्या युद्धातही मारुतीरायाची भूमिका निर्णायक असते.

अशा या महत्त्वाच्या भूमिकेत सनी देओल दिसणार असल्यामुळे चाहते त्याच्या फर्स्ट लूकची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण, चित्रपटसृष्टीतील सूत्रांनुसार मेकर्सनी या पात्राबाबत जाणीवपूर्वक मौन बाळगलं आहे. राम आणि रावणासारख्या मुख्य पात्रांना प्रमोशनचा भाग बनवणाऱ्या टीमने हनुमानाच्या बाबतीत मात्र सस्पेन्स कायम ठेवलाय. यामागे चित्रपटाची कथा आणि तिची मांडणी हेच मुख्य कारण असू शकतं, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

पहिल्या भागात हनुमानाच्या भूमिकेला कमी स्पेस?

सध्या समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार, 'रामायण'च्या पहिल्या भागात हनुमानाच्या भूमिकेला थोडी कमी स्पेस असणार आहे. दुसऱ्या भागात मात्र हनुमानाची भूमिका कथेचा मुख्य भाग असेल. त्यामुळेच पहिल्या भागाच्या प्रमोशनदरम्यान हनुमानाचा लूक उघड न करण्याचा निर्णय मेकर्सनी घेतला असावा, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी यापूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, पहिल्या भागाचा शेवट असा असेल की प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची प्रचंड उत्सुकता राहील. त्यांच्या या वक्तव्यानंतर, पहिल्या भागाच्या शेवटी हनुमानाची एन्ट्री होऊ शकते, अशी चर्चा चाहत्यांमध्ये सुरू आहे. अर्थात, यावर चित्रपट टीमकडून अद्याप कोणतंही अधिकृत स्पष्टीकरण आलेलं नाही.

'रामायण'च्या पहिल्या भागात नेमकी कोणती कथा असेल?

पहिल्या भागात प्रामुख्याने श्रीरामाची पार्श्वभूमी, रावणाची कथा, सीताराम विवाह, वनवास आणि सीताहरण यांसारख्या महत्त्वाच्या घटनांवर भर दिला जाण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या भागात राम-रावण युद्ध, वानरसेना, वाली-सुग्रीव कथा आणि हनुमानाचे पराक्रम सविस्तरपणे दाखवले जातील, अशी अपेक्षा आहे.

'रामायण'मध्ये सनी देओल हनुमान म्हणून कसा दिसणार, याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. चित्रपटाची टीम हनुमानाचा फर्स्ट लूक कधी रिलीज करणार? पहिल्या भागाच्या शेवटी मारुतीरायाचं दर्शन घडणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपल्याला अधिकृत अपडेटची वाट पाहावीच लागेल. नमित मल्होत्रा यांची निर्मिती आणि नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'रामायण'चा पहिला भाग ५ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.

PREV
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.
Read more Articles on

Recommended Stories

Imran Khan: भारत सोडण्याच्या नोटीसविरोधात इम्रान खान हायकोर्टात
Toxic Boss: कामाच्या वेळेत कॉफी प्यायला बंदी! बॉसच्या अजब फतव्याने कर्मचारी हैराण