
अभिनेत्री राधिका आपटेबद्दल अनेकवेळा माध्यमांमध्ये चर्चा सुरु असते. तिच्या प्रत्येक चित्रपटाला आणि वेब सीरिजला प्रेक्षकांचा मोठा पाठींबा मिळत असतो. राधिकाने एकदा एका साऊथच्या अभिनेत्याच्या कानफडात वाजवली होती आणि त्यामागे नेमकं काय घडलं होत तेच आपण जाणून घेणार आहोत.
राधिका आपटेने एक अनुभव शेअर केला आहे. त्यावेळी ती एका तमिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्या दिवशी शूटिंग सुरु होती आणि राधिकाने एका अभिनेत्याच्या कानाखाली वाजवली होती. त्या अभिनेत्याने राधिकाला गुदगुल्या करायला सुरुवात केली आणि मग तिला एवढा राग आला की तिने त्या अभिनेत्याच्या कानफडात वाजवली.
राधिका अभिनेत्याला ओळखत नव्हती तरीही तो तिच्या पायांना स्पर्श करायला लागला. राधिकाने बदलापूर चित्रपटामध्ये अश्लील सीन दिले होते, नंतर तिला अशाच प्रकारच्या चित्रपटांच्या ऑफर यायला सुरुवात झाली. तिला अशा प्रकारच्या भूमिका ऑफर करायला सुरुवात झाल्यानंतर ती त्रासून गेली होती.
राधिका आपटेने ‘शोर इन द सिटी’, ‘रक्त चरित्र’, ‘द वेटिंग रूम’ आणि ‘आय अॅम’ या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने मराठी, हिंदीसोबतच तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका केल्या. फक्त चित्रपटांमध्येच नाही तर ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘घुल’ सारख्या वेब सिरीजमध्येसुद्धा राधिकाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. करिअरबद्दल बोलायचं झालं तर राधिकाच्या अभिनय प्रवासाची सुरुवात 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतून झाली होती.